Kantara: Chapter 1 : ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) बहुप्रतिक्षित ‘कांतारा: चॅप्टर 1’ (Kantara: Chapter 1) या चित्रपटाने 2 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये धडाक्यात एन्ट्री केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने विक्रमी ओपनिंग केली आहे.
ट्रेड अनालिटिक्स वेबसाइट ‘सॅकनिल्क’च्या प्राथमिक अंदाजानुसार, ‘कांतारा: चॅप्टर 1’ ने पहिल्या दिवशी भारतात 60 कोटी रुपे कमावले आहेत. सकाळच्या शोमध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी असली तरी, सायंकाळच्या आणि रात्रीच्या शोमध्ये बुकिंगमध्ये प्रचंड वाढ झाली आणि चित्रपटाने ही दमदार कमाई केली.
हिंदी पट्ट्यात चांगली कमाई
‘कांतारा: चॅप्टर 1’ ने हिंदी भाषिक पट्ट्यात अंदाजे 19 ते 21 कोटी रुपये कमावले आहेत. सिंगल स्क्रीन थिएटर्समधील प्रतिसादामुळे या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
हिंदी मार्केटमध्ये कोणत्याही कन्नड चित्रपटासाठी ही दुसरी सर्वात मोठी ओपनिंग आहे. यशच्या ‘KGF: Chapter 2’ (54 कोटी रुपये) नंतर हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.
पहिल्या दिवशी कन्नड व्हर्जनमध्ये 88.13% इतकी सर्वाधिक ऑक्युपन्सी नोंदवली गेली. तर तेलुगु व्हर्जनमध्ये 75.34%, तामिळमध्ये 71.42% आणि हिंदी डब व्हर्जनमध्ये 29.84% ऑक्युपन्सी दिसून आली.
Kantara: Chapter 1 चित्रपटाबद्दल माहिती
Hombale Films निर्मित ‘कांतारा: चॅप्टर 1’ हा 2022 मध्ये आलेल्या ‘कांतारा’ या सुपरहिट चित्रपटाचा प्रीक्वलआहे. म्हणजेच, ही ‘कांतारा’ च्या पूर्वीची कथा आहे. ऋषभ शेट्टीनेच या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. रुक्मिणी वसंत (Rukmini Vasanth), जयराम आणि गुलशन देवैया यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हे देखील वाचा – मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन! गौतम अदानींची घोषणा