Modi AI Video – पंतप्रधान नरेंद्र आणि उद्योगपती गौतम अदानी (industrialist Gautam Adani)यांच्या मैत्रीवर व्यंगात्मक टीका करणारा एआय आधारित (AI-generated video) नवा व्हिडिओ काँग्रेसने (Congress) एक्सवर पोस्ट केला आहे. सब कुछ मेरे दोस्त के नाम कर दो असे या व्हिडिओचे शीर्षक आहे.
व्हिडिओमध्ये पंतप्रधानांचा आणि त्यांच्या सहायकाचा एआय अवतार (AI avatar)दाखवला आहे.त्यांचा सहायक पंतप्रधानांशी देशातील महत्त्वाचे प्रकल्प (National projects), जमीन आणि मालमत्ता खाजगी व्यक्तींना हस्तांतरित करण्याचा संवाद दाखवला आहे.तर यादरम्यान उद्योगपती अदानी यांचा हसणारा चेहरा दाखवला आहे.
सब कुछ मेरे 'दोस्त' के नाम कर दो pic.twitter.com/MwaE0PQ1e1
— Congress (@INCIndia) October 3, 2025
या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या एआय प्रतिमेला एका नकाशासमोर भविष्यातील प्रकल्पांचा आढावा घेत असताना दाखवले आहे. सुरुवातीला सहायक सोनप्रयाग केदारनाथ रोपवे प्रकल्प (Sonprayag–Kedarnath ropeway) दाखवतो. येथे लाखोंच्या संख्येने भाविक येतात. येथे मोठी कमाई होऊ शकते.त्यावर एआय पंतप्रधान उत्तर देतात, हा प्रकल्प माझ्या मित्राला द्या आणि कमाई नव्या बँकेच्या नव्या खात्यात (New bank account)जमा करा.यानंतर सहायक बिहारमधील भागलपूर येथील १०५० एकर वनजमिनीबाबत माहिती देतो.जिथे लाखो रुपये किमतीची झाडे आहेत. त्यावर एआय पंतप्रधान आदेश देतात की ही जमीन माझ्या मित्राला फक्त १ रुपयात द्या.
तेव्हा सहायक शंका व्यक्त करतो केवळ १ रुपयात? तर उत्तर येते की, सरकारी कागदांसाठी काहीतरी दाखवायला पाहिजे. उरलेला पैसा नव्या खात्यात जमा होईल.पुढे सहायक मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi redevelopment) जमीन आणि विमानतळे व बंदरे प्रकल्प दाखवतो आणि सांगतो की, येथून प्रचंड पैसा मिळू शकतो.पंतप्रधानांचे उत्तर पुन्हा तेच ही जमीनही मित्राला द्या आणि पैसे नव्या बँकेच्या नव्या खात्यात जमा करा.
शेवटी सहायक विचारतो की,सर जर तुमची ही चोरी पकडली गेली तर तुम्ही काय करणार. यावर व्हिडिओच्या अखेरीस मोदी यांचा व्हिडिओ चालवला जातो. त्यामध्ये ते म्हणत असतात की, अरे हम तो फकीर आदमी है, झोला लेके चल पडेंगे. त्यानंतर मोदी यांची एआय प्रतिमा जोरजोरात हसते.
हे देखील वाचा –
मुंबईच्या समुद्र किनार्यांवरील जीवरक्षकांची संख्या वाढणार
पूरग्रस्तांसाठी जेजुरी देवस्थानने १ कोटी ११ लाखांची मदत दिली
पुढील वर्षापर्यंत महागाई खुपच कमी राहाणार !स्टेट बँकेचा अहवाल