Home / महाराष्ट्र / Electronic bonds: कागदी बाँड संपले! आता इलेक्ट्रॉनिक बाँड प्रणाली; आयातदार-निर्यातदारांना मोठा दिलासा

Electronic bonds: कागदी बाँड संपले! आता इलेक्ट्रॉनिक बाँड प्रणाली; आयातदार-निर्यातदारांना मोठा दिलासा

Electronic bonds : महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बाँड प्रणाली (Electronic bonds) सुरू करण्यात आली आहे. महसूल खात्याच्या या उपक्रमामुळे कागदी बाँडची...

By: Team Navakal
Electronic bonds

Electronic bonds : महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बाँड प्रणाली (Electronic bonds) सुरू करण्यात आली आहे. महसूल खात्याच्या या उपक्रमामुळे कागदी बाँडची झंझट संपून सर्व प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल (Digital) पद्धतीने पार पडणार आहे. यामुळे राज्यातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी दिलासा मिळणार आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खात्यांतर्गत येणाऱ्या नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड आणि नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर यांच्या तांत्रिक सहाय्याने ही नवी प्रणाली राबवण्यात येणार आहे. कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीला आळा बसेल. तसेच बाँडमध्ये इलेक्ट्रॉनिक बदल किंवा रक्कम वाढविणे शक्य होणार आहे. कस्टम अधिकारी आणि ग्राहकांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतील

आता आयातदार आणि निर्यातदारांना विविध व्यवहारांसाठी वेगवेगळे कागदी बाँड देण्याची गरज राहणार नाही. एकाच इलेक्ट्रॉनिक बाँडद्वारे प्रोव्हिजनल असेसमेंट्स, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग इन बाँडेड वेअरहाऊसेस अशा सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतील. राज्य सरकारने ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कागदी स्टॅम्पची आवश्यकता पूर्णपणे संपणार आहे.


Web Title:
संबंधित बातम्या