Rashmika Vijay Engagement: गेले अनेक वर्ष डेट करत असल्याची चर्चा असलेल्या साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दोघांनी अखेर साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आल्यानंतर विजयच्या टीमने या बातमीला दुजोरा दिला आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याबाबत जास्त माहिती दिलेली नाही मात्र, विजयच्या टीमने ही आनंदाची बातमी खरी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, हे जोडपे पुढील वर्षी फेब्रुवारी 2026 मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या दोघांपैकी कोणीही सोशल मीडियावर किंवा सार्वजनिकरित्या त्यांच्या साखरपुड्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
रश्मिका आणि विजय यांच्यातील नात्याची चर्चा त्यांच्या 2018 मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘गीता गोविंदम’ आणि 2019 च्या ‘डियर कॉम्रेड’ या चित्रपटांनंतर सुरू झाली होती. तेव्हापासून हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांनी न्यू यॉर्क (New York) येथील 43 व्या इंडिया डे परेडचे नेतृत्वही केले होते.
तसेच, दोघे अनेकदा एकाच ठिकाणचे सुट्टीतील फोटो शेअर करताना चाहत्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. यामुळेच ते डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाली होती.
रश्मिका आणि विजय यांचे आगामी चित्रपट
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, रश्मिका मंदाना नुकतीच ‘कुबेरा’ (Kuberaa) चित्रपटात दिसली होती, ज्यात धनुष आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत होते. ती आता हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील ‘थम्मा’ (Thamma) या चित्रपटात दिसणार आहे.
याशिवाय तिचा ‘कॉकटेल 2’ आणि ‘द गर्लफ्रेंड’ , तसेच Mysaa हे चित्रपटही येणार आहेत. दुसरीकडे, विजय देवरकोंडा नुकताच गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित ‘किंगडम’ या चित्रपटात दिसला होता, ज्यात सत्यदेव आणि भाग्यश्री बोरसे यांच्याही भूमिका होत्या.
हे देखील वाचा– AYUSH Ministry: महाराष्ट्रात लवकरच स्वतंत्र आयुष मंत्रालय! केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांची मोठी घोषणा