Mahindra Thar 3-Door: भारतीय ऑटोमोबाइल उद्योगात आपल्या दमदार स्टाईल, पॉवर आणि ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या महिंद्रा थारचे (Mahindra Thar) नवीन थ्री-डोर फेसलिफ्ट मॉडेल अखेर बाजारात दाखल झाले आहे. सुमारे 5 वर्षांपूर्वी दुसऱ्या जनरेशनचे मॉडेल लॉन्च झाल्यानंतर, आता कंपनीने या नवीन थारला 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) या आकर्षक सुरुवातीच्या किमतीत विक्रीसाठी आणले आहे.
नवीन थार बाहेरून पाहता पूर्वीच्याच मजबूत लूकमध्ये आहे, पण आतून आणि काही लहान गोष्टींमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आली आहे.
नवीन थारमध्ये काय बदल झाले?
बाह्य रचना आणि रंग (Exterior Design and Colors):
- थारचा रग्ड (Rugged) आणि दमदार लुक कायम ठेवण्यात आला आहे, पण काही बदल करण्यात आले आहे.
- रेडिएटर ग्रिल आता बॉडी कलरमध्ये फिनिश करण्यात आले आहे, तर बंपरला सिल्व्हर ट्रिम दिल्याने त्याला डुअल-टोन लुक (Dual-Tone Look) मिळाला आहे.
- मागील बाजूस पार्किंग कॅमेरा, मागील वॉशर आणि वायपर असे नवीन फीचर्स जोडले गेले आहेत.
- सुविधेसाठी, आता इंधनाचे झाकण ड्रायव्हरच्या सीटवरून उघडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
- ही एसयूव्ही आता टँगो रेड (Tango Red) आणि बॅटलशिप ग्रे (Battleship Grey) या दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
केबिन आणि फीचर्स (Cabin and Features):
- केबिनमध्ये अनेक अपडेट्समुळे ही गाडी अधिक प्रॅक्टिकल आणि आधुनिक झाली आहे.
- पिलर-माउंटेड ग्रॅब-हँडल्स दिल्यामुळे कारमध्ये चढणे-उतरणे सोपे झाले आहे.
- पॉवर विंडो स्विचेस आता डोअर पॅनेलवर हलवण्यात आले आहेत.
- यामध्ये नवे स्टीयरिंग व्हील, 10.25 इंचची टचस्क्रीन (Android Auto आणि Apple CarPlay सह) आणि मागील एसी व्हेंट्स (Rear AC Vents) दिले आहेत.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, टचस्क्रीनमध्ये ‘ऍडव्हेंचर स्टॅट्स’ (Adventure Stats) हे खास फीचर आहे, जे ऑफ-रोडिंग करताना उंची, बॅंक अँगल, पीच आणि यॉ अँगलसारखे पॅरामीटर्स दर्शवते.
इंजिन पर्याय आणि किमतीची नवी रेंज
महिंद्राने अपडेटेड थार 3-डोरसाठी नवीन व्हेरिएंट लाइन-अप (Variant Line-up) जाहीर केली आहे. ही एसयूव्ही आता विविध इंजिन आणि ड्राइव्हट्रेन कॉम्बिनेशनसह उपलब्ध आहे:
- 1.5L डीझेल (D117 CRDe)
- 2.2L mHawk डीझेल
- 2.0L mStallion पेट्रोल इंजिन
यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचे पर्याय मिळतात. नवीन थारची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी ती 16.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
अनेक ग्राहकांना अपेक्षित असलेले 360 डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स आणि रॉक्स मॉडेलमधील ॲडव्हान्स्ड सस्पेंशनसारखे फीचर्स या 3-डोर थारमध्ये दिलेले नाहीत. तरीही 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑफ-रोडिंगसाठी ही थार अजूनही तरुणांसाठी एक ड्रीम एसयूव्ही ठरू शकते.
हे देखील वाचा– गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? अपघात प्रकरणात चंद्रकांत पाटील यांचे पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश