Home / महाराष्ट्र / Jogeshwari Metro : जोगेश्वरी मेट्रो स्थानकखालील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला

Jogeshwari Metro : जोगेश्वरी मेट्रो स्थानकखालील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला

Jogeshwari Metro – मुंबईतील जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात (Pothole)काल एका तरुणाचा पाय अडकला. या तरुणाचे नाव सिद्धेश (Siddhesh)असून...

By: Team Navakal
Jogeshwari Metro

Jogeshwari Metro – मुंबईतील जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात (Pothole)काल एका तरुणाचा पाय अडकला. या तरुणाचे नाव सिद्धेश (Siddhesh)असून ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतरच त्याचा पाय खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला.

शुक्रवारी रात्री उशिरा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील (Western Express Highway) जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली सिद्धेशचा पाय अचानक खड्ड्यात अडकला. त्याने आणि त्याच्या साथीदाराने पाय बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पोलीस (Police)आणि अग्निशमन दल (Fire brigade)घटनास्थळी पोहचले. या दरम्यान सिद्धेशची ऑक्सिजन पातळीही (Oxygen levels)कमी झाली होती, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतरच त्याला सुरक्षित वाचवण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेने (BMC) पावसाचे पाणी वाहून (Drain rainwater)जाण्यासाठी जोगेश्वरी परिसरात खड्डे तयार केले आहेत. मात्र, यातील बऱ्याच खड्ड्यांना कुंपण नाही. सूचना फलकही लावलेले नाही, ज्यामुळे अशा अपघाताची शक्यता वाढली आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


हे देखील वाचा –

पंतप्रधान मोदींच्या गुजरातचा शिक्षण दर्जा सर्वात वाईट

 सब मेरे दोस्त के नाम कर दो ! काँग्रेसचा नवा एआय व्हिडिओ

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकचीपाच-सहा विमाने पाडली ! हवाई दल प्रमुखांचे वक्तव्य

Web Title:
संबंधित बातम्या