E-bullet : वाढते प्रदूषण, इंधनाचे प्रचंड दर आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेऊन भोपाळ येथील विद्यार्थ्यांनी एक नवा प्रयोग केला आहे. एमएसआयटी अर्थात मॅनेजमेंट अँड सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Management and Science Institute of Technology) च्या विद्यार्थ्यांनी (Student) सौरऊर्जेवर चालणाऱ्या ई-बुलेट(E-bullet) या वाहनाची निर्मिती केली आहे.
या ‘ई-बुलेट’वर सोलर पॅनल बसवले असून सौरऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते. या बॅटरीमधील ऊर्जेवर वाहन चालते. तसेच, या वाहनासाठी कंट्रोलर युनिट,लिथियम-आयर्न बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. सध्या तीनचाकी वाहनांवरच सोलर पॅनल बसविण्यात येते. स्टुडंट्स वेल्फेअर विभागाचे डीन प्रा. शैलेंद्र जैन यांनी सांगितले की, ई-बुलेटचा प्रयोग यशस्वी ठरल्यास वाहनक्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकते त्यामुळे वाहनक्षेत्रात सौरऊर्जेचा वापर वाढू शकेल. या प्रयोगामध्ये वाहनावर लावलेले पॅनल वीज तयार करतात. सोलर ऊर्जेची योग्यरीत्या साठवणूक करून ती बॅटरीत पाठवली जाते. ही बॅटरी ऊर्जा साठवून गरजेनुसार वाहनाला पुरवते. बॅटरीतील ऊर्जेच्या साहाय्याने वाहनाला गती दिली जाते.
हे देखील वाचा –