Home / देश-विदेश / Road Accident : इटलीमध्ये रस्ता अपघातात नागपूरच्या दांपत्याचा मृत्यू

Road Accident : इटलीमध्ये रस्ता अपघातात नागपूरच्या दांपत्याचा मृत्यू

Road Accident – फ्रान्सहून इटलीला (Italy)निघालेल्या एका मिनी बसला इटलीत क्रोसेडो (Croceto) जवळ झालेल्या अपघातात नागपूरच्या दांपत्याचा (Nagpur couple) मृत्यू...

By: Team Navakal
Road Accident


Road Accident – फ्रान्सहून इटलीला (Italy)निघालेल्या एका मिनी बसला इटलीत क्रोसेडो (Croceto) जवळ झालेल्या अपघातात नागपूरच्या दांपत्याचा (Nagpur couple) मृत्यू झाला आहे. अपघातात त्यांची ३ मुलेही जखमी झाले असून त्यातील मोठ्या मुलीची प्रकृती चिंताजनक (children injured) असल्याची माहिती इटलीतील भारतीय दूतावासाने (Indian Embassy)दिली आहे.


नागपूर येथील हॉटेल व्यवसायिक जावेद अख्तर (Javed Akhtar)त्यांची पत्नी नादिरा गुलशन (Nadira Gulshan) व आपल्या तीन मुलांसह युरोप (Europe) सफरीला गेले होते. ते गुरुवारी फ्रान्समधील (France)आपला प्रवास आटोपून इटलीतील टस्कन येथे जात होते. त्याच्यासह काही अशियाई प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या त्यांच्या मिनी बसला (Mini-bus)एका ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात या दोघांचा व त्यांच्या वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर प्रवास करत असलेली त्यांची मुले आरजू अख्तर, शिफा अख्तर व जाजेल अख्तरही जखमी झाले असून त्यातील आरजूची प्रकृती चिंताजनक आहे. जावेद अख्तर हे नागपूरच्या सिताबर्डी (Sitabardi)भागात असलेल्या गुलशन प्लाझा या हॉटेलचे मालक होते. २२ सप्टेंबरला ते कुटुंबियांसमवेत युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. भारतीय दूतावासाने इटलीतील प्रशासनाशी संपर्क साधून त्यांचे पार्थिक भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


हे देखील वाचा –

पंतप्रधान मोदींच्या गुजरातचा शिक्षण दर्जा सर्वात वाईट

जोगेश्वरी मेट्रो स्थानकखालील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला

दिवाळीत ग्राहकांना स्वस्त कांदा मिळणार

Web Title:
संबंधित बातम्या