Home / महाराष्ट्र / Adivasi protester : कळवण पोलीस स्थानकावर आदिवासी आंदोलकांची दगडफेक

Adivasi protester : कळवण पोलीस स्थानकावर आदिवासी आंदोलकांची दगडफेक

Adivasi protester : नाशिकच्या कळवण येथे आदिवासी शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल...

By: Team Navakal
Adivasi protester

Adivasi protester : नाशिकच्या कळवण येथे आदिवासी शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आजा आदिवासी समाजाने आंदोलन (Adivasi protest) केले. आंदोलनादरम्यान आदिवासी आंदोलकांनी पोलीस (Police) स्थानकावर दगडफेक केली. यात काही पोलीस आणि पत्रकार जखमी झाले.

कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप समाजाचा आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांनी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी त्यांनी कळवण पोलिस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच काही आंदोलकांनी थेट पोलीस स्थानकावर दगडफेक केली.

दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी आणि पत्रकार जखमी झाले, तर पोलिस वाहनाच्या काचा फुटल्या. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.


हे देखील वाचा –

अमेरिकेचे शटडाऊन लांबले; निधी विधेयक चौथ्यांदा नामंजूर

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या