Home / देश-विदेश / Lucknow Poster War: राहुल गांधी रामाच्या रूपात!काँग्रेसच्या बॅनरमुळे वाद

Lucknow Poster War: राहुल गांधी रामाच्या रूपात!काँग्रेसच्या बॅनरमुळे वाद

Lucknow Poster War उत्तर प्रदेशच्या लखनौमधील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर विजयादशमीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या बॅनरवर रावण...

By: Team Navakal
Lucknow Poster War

Lucknow Poster War उत्तर प्रदेशच्या लखनौमधील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर विजयादशमीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या बॅनरवर रावण वधाचे दृश्य चितारले असून राहुल गांधी यांना (Rahul gandhi )प्रभू रामचंद्रांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. त्यावरून भाजपाने काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला आहे.

काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या या बॅनरवर रामाच्या रुपातील राहुल गांधी मतचोर रावणाचा धनुष्यबाणाने वध करत असल्याचे दाखवण्यात आले होते. सोबत लक्ष्मणाच्या रूपात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय आहेत. महागाई, भ्रष्टाचार , जंगलराज,निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, बेरोजगारी आणि हुकूमशाही अशी रावणाची तोंडे आहेत. महत्त्वाचे म्हणजे या बॅनरवर आर्यन मिश्रा, लखनौवासी असे लिहिले आहे.

या बॅनरवर भाजपाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे .अयोध्येतील श्रीराम मंदिराकडे पाठ फिरवणारे राहुल गांधी आता स्वतःला रामाच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी केली. काँग्रेसचे हे कृत्य अत्यंत वेदनादायक आहे. हिंदू देव-देवतांचा सातत्याने अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता नक्कीच धडा शिकवेल, असे त्रिपाठी पुढे म्हणाले.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

अमेरिकेचे शटडाऊन लांबले; निधी विधेयक चौथ्यांदा नामंजूर

कुलाबा-कफ परेडमधील मोक्याच्या भूखंडावर झोपू योजनेचा हट्ट कशाला ?मुंबई हायकोर्टाचा सवाल

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या