Home / देश-विदेश / Bihar vidhan sabha election: बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत ! 6, 11 नोव्हेंबरला मतदान! 14 ला निकाल

Bihar vidhan sabha election: बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत ! 6, 11 नोव्हेंबरला मतदान! 14 ला निकाल

Bihar vidhan sabha election -केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार राज्यात 6 आणि 11 नोव्हेंबर अशा...

By: Team Navakal
Bihar vidhan sabha election

Bihar vidhan sabha election -केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार राज्यात 6 आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. चौदा लाख नव्या मतदारांसह एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत नितीश कुमार यांचा जदयू आणि भाजपाची सत्ता लालूप्रसाद यादव यांचा राजद आणि काँग्रेसची इंडिया आघाडी उलथवणार का, याची उत्सुकता आहे.

बिहार निवडणूक (Bihar vidhan sabha election)ही बिहारींचा मोठा सण असलेल्या छटपूजेनंतर जाहीर म्हटले जात होते. परंतु निवडणूक आजच जाहीर झाल्याने 25 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या छटपूजेच्या काळात आचारसंहिता असेल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुमारे साडेसात कोटी मतदार असलेल्या या अवाढव्य मतदान प्रक्रियेसाठी आयोगाने सर्व आघाड्यांवर केलेली जय्यत तयारी, निवडणूक प्रक्रियेत केलेल्या सुधारणा, मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आणि पारदर्शकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती दिली.

ज्ञानेश कुमार म्हणाले की, बिहारमध्ये एकूण 243 जागा असून, मतदारांची संख्या 7.42 कोटी आहे. यात 3.92 कोटी पुरुष, तर 3.50 कोटी महिला मतदार आहेत. 4 लाख ज्येष्ठ मतदार असून, त्यात 100 वर्षांहून अधिक वय असलेले 14,000 मतदार आहेत. 14 लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, मतदारांना

तासन्‌‍तास रांगेत उभे राहू नये यासाठी पहिल्यांदाच राज्यात 90 हजार 712 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या जास्तीत जास्त 1,200 असेल. तर सर्व मतदान केंद्रे आणि मतदारांची एकूण संख्या मोजली तर प्रत्येक केंद्रावर सरासरी 818 मतदार असतील. सर्व मतदान केंद्रांवर यावेळी पहिल्यांदाच वेब कास्टिंगची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच मतदारांसाठी वीज, पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी तळमजल्यावर मतदान केंद्रे, रॅम्प, व्हिलचेअर आणि मदतनीसांची व्यवस्था असेल. 85 वर्षांवरील ज्या व्यक्तींना मतदान केंद्रावर येऊन मतदान करणे शक्य होणार नसेल त्यांनी 12-ड अर्ज भरल्यास त्यांना घरातच मतदान करू देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने देशात पहिल्यांदाच मतदान प्रक्रियेत 17 सुधारणा केल्याअसल्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल. या 17 नव्या सुधारणा पुढे संपूर्ण देशात लागू केल्या जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आयोगाने केलेल्या सुधारणांची माहिती देताना ज्ञानेश कुमार यांनी ईसीआयनेट या ॲॅपचा उल्लेख केला. निवडणूक आयोगाने आतापर्यंत मतदारांच्या सोयीसाठी वेगवेगळी चाळीस ॲप उपलब्ध करून दिली होती. मात्र एवढी सारी ॲप कोणालाही आपल्या मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करणे शक्य नाही. ही समस्या सोडविण्यासाठी ईसीआयनेट हे नवे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपमध्ये याआधीच्या सर्वचा सर्व चाळीस ॲपमधून देण्यात येणाऱ्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, पहिल्यांदाच सर्वच्या सर्व 243 मतदार संघांसाठी 243 आयएएस दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून काम करणार आहेत. हे सर्व अधिकारी बिहारचे नसतील, याची काळजी घेण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा अडचण असल्यास मतदार मतदान बुथ स्तरावरील अधिकाऱ्याशी (बीएलओ) थेट संपर्क साधू शकतील. बीएलओकडून शंकेचे, समस्येचे निराकरण न झाल्यास मतदार विशेष निरीक्षकांशी, राज्य निवडणूक आयुक्तांशी किंवा 1950 या विनामूल्य क्रमांकावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपली तक्रार मांडू शकतो, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पहिल्यांदाच साडेआठ लाख कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जगातील केवळ दहा-बारा देशांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रियेचे नियोजन करण्याची क्षमता असेल.

बिहारचा विकास झाला

आयुक्तांचे अजब वाक्य

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पत्रकार परिषदेत म्हणाले की, देशाचा जो विकास झाला आहे तो पाहता आणि बिहारचा जो विकास झाला आहे तो पाहता हल्ली सगळ्यांकडे मोबाईल असतो. केंद्रिय निवडणूक आयुक्तांच्या या अजब वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बिहारची निवडणूक जाहीर करताना खुद्द निवडणूक आयुक्तच बिहारचा विकास झाला आहे असे म्हणतात हे आक्षेपार्ह आहे. मोबाईल हा बूथ बाहेर ठेवण्याची व्यवस्था आहे इतकी सरळ माहिती देण्याऐवजी भारताचा आणि बिहारचा विकास झाला आहे हे आयुक्तांनी म्हणणे अयोग्य आहे, अशी चर्चा लगेच सुरू झाली.

2020 चे बलाबल

भाजपा- 80

जदयू – 65

राजद – 77

काँग्रेस – 19

डावे – 15

हिंदुस्तान अवामी मोर्चा- 4

ओवेसीचा पक्ष -1

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!दिवाळीनंतर निवडणुकीचे बिगूल

बँक कर्जवाटप घोटाळ्याचे नितेश राणे मुख्य सूत्रधार ! राजन तेलींची पोलिसांकडे तक्रार

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या