Maharashtra Electricity Price Hike: दिवाळीच्या तोंडावरच महावितरणने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. इंधन समायोजन शुल्कामुळे (Fuel Adjustment Charges) वीज दरात वाढ (Hike in Electricity Charges) करण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात वापरलेल्या विजेच्या बिलात आता प्रति युनिट 35 पैशांपासून ते 95 पैशांपर्यंत वाढ होणार आहे.
महावितरणने 1 ऑक्टोबर 2025 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, ही वाढ सर्व प्रकारच्या ग्राहकांना लागू होईल. यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहक समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे 1 जुलैपासून वीज दर कमी केल्याचा दावा महावितरणने यापूर्वी केला होता, मात्र आता हे FAC शुल्क लागू केल्याने वाढीव वीज बिल येणार आहे.
Maharashtra Electricity Price Hike: नवीन स्लॅबनुसार प्रति युनिट किती वाढ?
ग्राहकांनी केलेल्या वीज वापराच्या स्लॅबनुसार ही दरवाढ लागू करण्यात आली आहे:
वीज वापर (युनिट्स) | प्रति युनिट अतिरिक्त शुल्क |
1 ते 100 युनिट्स | ₹0.35 (35 पैसे) |
101 ते 300 युनिट्स | ₹0.65 (65 पैसे) |
301 ते 500 युनिट्स | ₹0.85 (85 पैसे) |
500 युनिट्सहून अधिक | ₹0.95 (95 पैसे) |
दरवाढीचे कारण काय?
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, वीजेच्या मागणीत झालेली वाढ आणि खुल्या बाजारातून जास्त दराने वीज खरेदी करावी लागल्यामुळे ही शुल्कवाढ आवश्यक आहे. तसेच, उच्च उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर वाढल्यामुळे झालेला खर्च FAC च्या माध्यमातून वसूल केला जात आहे.
महावितरणने हा इंधन समायोजन शुल्क पुढील आदेशापर्यंत लागू राहील असे स्पष्ट केले आहे. मात्र, येत्या वर्षांत वीज दरात घट होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ऑक्टोबरमध्ये येणारे वीज बिल वाढीव दराने येणार असल्याने, सणासुदीच्या खर्चात असलेल्या कुटुंबांवर आणि व्यवसायांवर हे अपेक्षित आर्थिक संकट आले आहे.
हे देखील वाचा –