Home / arthmitra / Flipkart Sale मध्ये लाखो ग्राहकांची फसवणूक? iPhone स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून 5,000 रुपये बुडवल्याचा आरोप

Flipkart Sale मध्ये लाखो ग्राहकांची फसवणूक? iPhone स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून 5,000 रुपये बुडवल्याचा आरोप

Flipkart Sale: वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) त्यांच्या बहुप्रतिक्षित बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale) मुळे सध्या...

By: Team Navakal
Flipkart Sale

Flipkart Sale: वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) त्यांच्या बहुप्रतिक्षित बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale) मुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या सेलपूर्वी iPhone 16 Pro स्वस्त दरात मिळवण्यासाठी 5,000 चा ‘प्री-रिझर्व्ह पास’ विकल्याचा आणि ग्राहकांना आयफोन न मिळाल्यास पैसे परत न केल्याचा गंभीर आरोप युजर्स करत आहेत.

नेमका वाद काय आहे?

फ्लिपकार्टने सेल सुरू होण्यापूर्वी iPhone 16 Pro (128GB मॉडेल) सवलतीच्या दरात मिळेल या आश्वासनावर 5,000 रुपयांच्या प्री-पासची विक्री केली.

कंपनीने दावा केला होता की, हा पास खरेदी करणाऱ्यांना iPhone 16 Pro सुमारे 70,000 रुपयांमध्ये मिळेल. काही निवडक लोकांना (लिमिटेड युनिट्समुळे) या दरात आयफोन मिळाला खरा, पण ज्यांना मिळाला नाही, त्यांचे 5,000 रुपये बुडाले.

‘नॉन-रिफंडेबल पास’मुळे ग्राहकांचे नुकसान

या प्रकरणात ग्राहकांचे नुकसान होण्याचे मुख्य कारण म्हणजे फ्लिपकार्टचे नियम आणि अटी. कंपनीच्या अटींनुसार, हा 5,000 रुपयांचा पास ‘नॉन-कॅन्सिलेबल’ आणि ‘नॉन-रिफंडेबल’ होता. जर पास घेतलेला ग्राहक पहिल्या 48 तासांत iPhone 16 Pro खरेदी करू शकला नाही, तर पास आपोआप रद्द होईल आणि पैसे परत मिळणार नाहीत, असे नियमांमध्ये नमूद होते.

यामुळे, ज्या लाखो युजर्सनी 5,000 रुपये पाससाठी भरले, परंतु ‘लिमिटेड युनिट्स’मुळे आयफोन खरेदी करू शकले नाहीत, त्यांचे पैसे बुडाले.

ऑर्डर कॅन्सलचेही गंभीर आरोप

अनेकांनी केवळ पासच नाही तर प्रत्यक्ष iPhone 16 Pro बुक केला होता, परंतु नंतर फ्लिपकार्टने स्वतःहून तो ऑर्डर रद्द केल्याचा आरोप युजर्सनी X (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केला आहे.

काही युजर्सच्या म्हणण्यानुसार, त्यांची ऑर्डर जवळच्या हबपर्यंत पोहोचल्यानंतरही कंपनीने ती रद्द केली. काही यूजरने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्यांना आयफोन मिळाला नाही, त्यांचे 5,000 रुपयांचे थेट नुकसान झाले आहे.

या अन्यायी पद्धतीने हजारो ग्राहकांचे पैसे बुडवून फ्लिपकार्टने मोठा नफा कमावल्याचा आरोप युजर्स करत आहेत. अनेक जण ग्राहक न्यायालयात कंपनीविरुद्ध खटला भरण्याची तयारी करत आहेत.

हे देखील वाचा – MPSC Group C Exam: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; 938 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या