Rapid increase in gold prices आजकाल सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहे. दर दिवसाला सोन्याच्या भावात वाढ होत आहे. आणि आता सोन्याची दरवाढ हि तब्बल २००० रुपयांनी वाढली आहे. दिवाळीतही सोन घ्याच कि नाही असा प्रश्न आता सर्वसामान्यानां पडला आहे.
MCX वर सोन्याची किमंत जवजवळ १,२०,३२५ रूपये इतकी आहे. आणि आजच्या घडीचा सोन्याचा वायदा तब्बल 450 रुपयांनी वाढलेला आहे. सोन्याच्या किमती दररोज नव्याने वाढ होत आहे.
सराफ बाजारात सुद्धा सोन्याच्या किमतींचा धुरळा बघायला मिळत आहे. या घडीला २४ कॅरेट सोन्याची किमत ही १,२०,७८० रुपये इतकी आहे. तर;
१० ग्रॅमनुसार २२ कॅरेट सोन्याची किमत ही १,१०,७१० रुपये एवढी आहे. त्यामुळे; सराफा बाजारातही सोन्याच्या किमतींनी धुमाकुळ घातलेला आहे.
सर्वसाधारणपणे मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या प्रमुख शहरात दिवाळीत सोन्याच्या खरेदी हि मोठ्या प्रमाणात सुरु होईल. त्यामुळे किमतींमध्ये झपाट्याने वाढ वाढण्याची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच; नाशिकमध्ये १,२०,८१० रुपये, पुण्यात १,२२,०२० रुपये आणि मुंबईमध्ये १,२२,०२० रुपये या भावाने सध्या सोन्याची विक्री सुरु आहे.
सोन्यासोबत चांदी देखील महाग..
सोण्यापाठोपाठ चांदीच्या किमतीत देखील वाढ होताना दिसत आहे. एक किलो चांदीची किमती आज १,५६,१०० रुपये अशी आहे. त्यामुळे या सगळ्या महागाईवर सर्वसामान्य माणूस कश्या पद्धतीने नियोजन करणार हे पाहन महत्वाच ठरेल.
हे देखील वाचा –
Shilpa Shetty Interrogation: तब्बल 60 कोटींची फसवणूक प्रकरण, शिल्पा शेट्टीची ४:३० तास कसून चौकशी