Home / महाराष्ट्र / ST Reservation : गेवराईत धनगर आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपविले

ST Reservation : गेवराईत धनगर आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपविले

ST Reservation – धनगर समाजाला (Dhangar) अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील गेवराई (Georai)येथील ज्ञानदेव नामदेव...

By: Team Navakal
ST Reservation

ST Reservation – धनगर समाजाला (Dhangar) अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील गेवराई (Georai)येथील ज्ञानदेव नामदेव कोल्हे (Dnyandev Namdev Kolhe) (४५) यांनी काल मध्यरात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

कोल्हे गेवराई शहरात ते पिठाची गिरणी चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कोल्हे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी लिहिले होते की, मी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत आहे. माझे बलिदान (Sacrifice) वाया जाऊ देऊ नका.

गेल्या काही दिवसांपासून जालना (Jalna)येथे धनगर समाजाचा संघर्ष सुरू असून, दीपक बोराडे (Deepak Borade)हे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणावर बसले होते. सरकारकडून या आंदोलनाची गंभीर दखल न घेतल्यामुळे ज्ञानदेव कोल्हे मानसिक तणावाखाली होते.


हे देखील वाचा –

‘मनाचे श्लोक’ नावाचा वाद ;ट्रेलर हटवण्याची मागणी

बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत ! 6, 11 नोव्हेंबरला मतदान! 14 ला निकाल

राजेशाही पदव्यांचा उल्लेख करू नका; जयपूर घराण्याला कोर्टाचा आदेश

Web Title:
संबंधित बातम्या