Jarange Insults RaGa, Congress outraged – मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख दिल्लीचा लाल्या असा केल्याने काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जरांगे पाटील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका करताना राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हटले की, मराठ्यांच्या विरोधात बोल म्हणून तिकडून दिल्लीहून.लाल्याने सांगितले असेल. कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागली आहे.
त्याचं कोण ऐकतंय इथे, असे म्हणत जरांगेनी विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीकास्त्र डागले. जरांगे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेत्यांनी जरांगे यांनी वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह असून ती मराठा समाजाला शोभणारी नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.
एका समाजाला न्याय देण्याच्या गोष्टी करताना शब्द प्रतिष्ठापूर्ण असावेत आणि भाषा सभ्य असावी लागते. या लढ्यात कुठेही उथळपणा येता कामा नये. वारंवार नेत्यांवर टीका करणे, हा काय ‘मेरी गो राऊंडचा खेळ’ नाही, असे म्हणत काँग्रेसने जरांगे यांना आरक्षणाचा लढा राजकीय न करण्याचाही सल्ला दिला.
हे देखील वाचा –
‘मनाचे श्लोक’ नावाचा वाद ;ट्रेलर हटवण्याची मागणी
बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत ! 6, 11 नोव्हेंबरला मतदान! 14 ला निकाल
राजेशाही पदव्यांचा उल्लेख करू नका; जयपूर घराण्याला कोर्टाचा आदेश