Prithvi Shaw-Musheer Khan Fight: आगामी रणजी करंडक 2025-26 (Ranji Trophy) स्पर्धेसाठी सुरू असलेल्या तयारीदरम्यान महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यात पुण्यात खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे. या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचा खेळाडू पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) शानदार खेळी केली.
मात्र, बाद झाल्यानंतर मुंबईचा खेळाडू मुशीर खानवर धावून गेल्याचे पाहायला मिळाले. यामुळे सामन्यात मोठा वाद निर्माण झाला.
पृथ्वी शॉने मुंबईविरोधात धमाकेदार 181 धावांची खेळी केली. मात्र, बाद झाल्यानंतर तो रागाच्या भरात मुंबईच्या खेळाडूंवर, विशेषतः युवा मुशीर खानवर बॅट घेऊन धावला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Heated exchange between Prithvi Shaw and Mumbai players after his wicket! pic.twitter.com/l9vi1YgeYs
— INSANE (@1120_insane) October 7, 2025
मुंबईविरुद्ध पृथ्वी शॉचा तुफानी खेळी
गेली आठ वर्षे मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर या हंगामात महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने पहिल्याच दिवशी आपली क्षमता दाखवून दिली. शॉने 219 चेंडूंमध्ये 181 धावांची झंझावाती खेळी केली आणि त्याने केवळ 140 चेंडूत शतक पूर्ण केले.
या खेळीदरम्यान त्याने सलामीचा फलंदाज अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 305 धावांची (305 runs) त्रिशतकी भागीदारी रचली. या शतकी खेळीमुळे आगामी रणजी हंगामासाठी तो पूर्णपणे तयार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
मैदानात ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा
शॉ 181 धावांवर खेळत असताना, मुंबईचा युवा खेळाडू मुशीर खान याने सीमारेषेवर त्याचा झेल टिपून त्याची वादळी खेळी संपुष्टात आणली. शॉ बाद झाल्यानंतर हा वाद सुरू झाला. बाद होऊन पॅव्हेलियनकडे परतत असताना पृथ्वी शॉ आणि मुशीर खान यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
मुशीरच्या स्लेजिंगमुळे पृथ्वी शॉने संयम गमावला आणि तो आपली बॅट घेऊन थेट मुशीर खानच्या दिशेने धावला. त्यामुळे मैदानात गोंधळ वाढल्याने तातडीने अंपायरआणि मुंबईचे इतर खेळाडू मध्ये पडले आणि त्यांनी दोन्ही खेळाडूंना शांत केले.
अंपायरने पृथ्वी शॉला बाजूला केले आणि मुंबईच्या खेळाडूंनी मुशीर खानला दूर नेले, त्यानंतर हा वाद मिटला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा –