Weather Update: ऑक्टोबर सुरु झाला तरीही पाऊस जायचं काही नाव घेत नाही आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. हवामानात बदल होत असून, अरबी समुद्रातील ‘शक्ती’ या तीव्र चक्रीवादळाचा परिणाम होताना दिसत आहे. या शिवाय परतीच्या पावसाचा बदल यांचा संयुक्त प्रभाव देखील दिसू लागला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (IMD Forecast)
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, मराठवाड्यात ७ ते ११ या काळातऑक्टोबरदरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम प्रमाणात पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत ७ ऑक्टोबरला तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत ८ आणि ९ ऑक्टोबर या कालावधीत मेघगर्जना आणि पर्जन्यमानाची शक्यता वर्तवली आहे. या दिवसांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
‘शक्ती’ चक्रीवादळाने (Shakti Cyclone) ६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी पश्चिम-मध्य आणि वायव्य अरबी समुद्रावर वेग घेतला होता. हे वादळ सध्या मसिरा (ओमान) पासून सुमारे 180 किमी आग्नेयेस, कराचीपासून ९३० किमी नैऋत्ये दिशेस ते द्वारकापासून ९७० किमी पश्चिम-नैऋत्येस स्थित आहे. परंतु याची तीव्रता काही काळात कमी होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. मात्र, वादळी वाऱ्यांच्या दिशेने झालेल्या बदलामुळे महाराष्ट्रात पर्जन्यमानाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता आहे.
यामध्ये प्रामुख्याने यलो अलर्ट मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर व पूर्व विदर्भ या भागांना दिला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भातील अश्या काही जिल्ह्यामध्ये आहे.
८ ऑक्टोबरपासून पालघर, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यानां यलो अलर्ट देण्यात आला होता. याच प्रमाणे याठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे.
९ ऑक्टोबरला देखील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरमध्ये यलो अलर्ट
१० ऑक्टोबर या दिवशीसुद्धा कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस कायम राहील.
याचदरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांना काही शिफारसी देखील केल्या आहेत. त्यानुसार, काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक देखील करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर लवकर मळणी करून घायवी. तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पिकात, फळबागेत, आणि भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
हे देखील वाचा –
case of suicide: १८व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी संपवलं जीवन, विरारमधील धक्कादायक घटना..









