Ban on felling trees: सिंधुदुर्ग-दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यतील १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी करण्यात आली आहे. तर; पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स (Task Force) २५ गावे इको सेन्सिटीव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे . उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील जनहीत याचिका क्र. १९८/२०१४ सह १७९/२०१२ मध्ये दि.५ डिसेंबर २०१८ व दि २२ मार्च २०२४ च्या आदेशाचे संपूर्ण दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातलेली आहे. या संदर्भातील माहिती सावंतवाडी दोडामार्ग टॉस्क फोर्स समितीचे सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली.
या समितीमध्ये प्रामुख्याने महसूल विभाग, वन विभाग आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स (Task Force) समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी प्रांताधिकारीअसून सदस्य सचिव सहाय्यक वनसंरक्षक हे देखील आहेत. या समितीच्या मासिक बैठकीमध्ये उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी केलेली कार्यवाही याच बरोबरीने प्रचार-प्रसिध्दी आणि प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जातो.
सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स (Task Force) समितीने ठरविल्याप्रमाणे ,दोडामार्ग तालुक्यात कोठेही गावात खाजगी, मालकी तसेच शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होताना निदर्शनास आल्यास घटनेबाबत जनतेने गावातील पोलिस पाटीलन किंवा वनरक्षक, तलाठी यापैकी कोणालाही तातडीने कळवावे. तसेच अशा प्रकारच्या चौकशी प्रकरणामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर नागरीकांनी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे अशी विनंती देखील करण्यात आली आहे. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड प्रकरणी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम १९६४ आणि महाराष्ट्र जमीन महसूल झाडे इत्यादींच्या अधिकारांनबाबतीतील नियमांचे उलंघन झाले असल्यास नियम १९६७ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल.
वृक्षतोडीबाबत ऑनलाईन तक्रारीसाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स (Task Force) समीतीचा ईमेल आयडी तयार करण्यात आलेला आहे. त्याचा ईमेल आयडी पुढील प्रमारें असेल : sdtfsawantwadi@ gmail.com. या ईमेलवरती आपण वृक्षतोडीच्या घटनाबाबत तक्रार देऊ शकता. याशिवाय तक्रार करण्यासाठी आपण वनविभाग सावंतवाडी ०२३६३-२७२००५ यांच्याकडे दूरध्वनीव्दारेही तक्रार दाखल करू शकता.
सावंतवाडी- दोडामार्ग टास्क फोर्स समीतीचे कार्यक्षेत्रामध्ये समावेश असलेल्या गावांची यादी : यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील गावे असनिये, पडवे माजगाव, भालावळ, तांबोळी, सरमळे, दाभिळ, ओटावणे,कोनास, घारपी, उडेली, तसेच केसरी, फणसवडे यायचं समावेश आहे. तर दोडामार्ग तालुक्यातील गावे कुंभ्रल, पंतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझार, शिरवळ, उघाडे, काळणे, भिकेकोनाळ,कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी या गावांचा देखील समावेश आहे.
हे देखील वाचा –
Weather Update:ऑक्टोबर आला तरी पाऊस काही थांबेना..महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधारेचा इशारा









