AI leopard: बिबट्यांच्या (leopard News) बातम्या आता सरास पाहायला मिळतात. बिबट्यामुळे (leopard)आपले जीव गमावलेले देखील भरपूर लोक आहेत. त्यामुळे सतत ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असत. पण आता एआय बिबट्या (leopard) चांगला ट्रेण्ड होतोय. बिबट्या दृष्टीपथास पडल्याची कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI)तंत्राद्वारे तयार केलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याचा खोडसाळपणा वारंवार केला जात आहे. यामुळे वन विभागाची दिशाभूल होत असून नागरिकांमध्ये दहशतीच वातावरण निर्माण होत आहे. हि गैरकृत्य वेळीच थांबण्यासाठी वन विभागाने शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे.
नाशिकमध्ये बिबट्या-मानव संघर्ष तीव्र होतना दिसत आहे. जिल्ह्यात मागील काही महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड आणि काही प्रमाणात दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावात बिबट्यांच साम्राज्य आहे. अंधारात लोक घराबाहेर पडत देखील नाहीत. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे वन विभागाने नाशिक आणि निफाड येथे कायमस्वरुपी चार बचाव पथके तैनात केली असतात मागील काही दिवसांत नाशिक पश्चिम विभागात सात बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद देखील करण्यात आले. अशा गंभीर परिस्थितीत समाजमाध्यमांवर अश्या प्रकारचा खोडसाळपणा केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी टागोरनगर भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे सांगितले गेले. मागील दोन, तीन दिवसात नवीन नाशिक, कामटवाडे, खुटवडनगर भागात बिबट्याचे दर्शन घडल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांतून चांगलीच वायरल होत आहेत. वन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत छाननी केली असता, बिबट्याचे ठसे आढळले नाहीत. सीसीटीव्हीत देखील वावर दिसला नाही, असे वन विभागाचे अधिकारी सुमित निर्मल यांनी सांगितले. शहरात अनेक ठिकाणी एआयद्वारे तयार केलेली बिबट्याची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. खोडसाळपणाचे हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी अशी छायाचित्रे प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वन विभागाने केली आहे.
हे देखील वाचा –
Bigg Boss ended: बिग बॉस शो मध्येच बंद..स्पर्धकांचं काय झाल??