Farmer suicide: चंद्रपूरातील भद्रावती (Bhadravathi) तहसील कार्यालयात शेतकरी (Farmer) परमेश्वर मेश्राम यांनी विष प्राशन करून जागीच आत्महत्या केली. हि घटना ७ ऑक्टोबर रोजी झाली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि दिवंगत बाळू धानोरकर (Balu dhanorkar) यांचे भाऊ अनिल धानोरकर यांच्यावर जमीन व्यवहारातील फसवणुक केल्याचा आरोप केला. तसेच मेश्राम कुटुंबाने न्याय मिळत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
परमेश्वर मेश्राम यांची 8.5 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. २००६ मध्ये मेश्राम यांनी या जमिनीच्या विक्रीचा व्यवहार दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत केला होता. पण धानोरकर यांनी विक्रीचे पैसे दिले नाहीत आणि दिलेले चेक बाउन्स झाले. या व्यवहारावरून परमेश्वर मेश्राम यांनी न्यायालयात धाव घेतली होती आणि निकाल त्यांच्या बाजूने आला होता.
गेल्या दोन वर्षांपासून तहसील कार्यालयातून जमिनीचा फेरफार मेश्राम यांच्या नावावर करण्यास टाळाटाळ होत होती. यामुळे त्रस्त होऊन त्यांनी विष प्राशनाचा मार्ग स्वीकारला. या प्रकरणी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर ३ ऑक्टोबर रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दुसरीकडे, याच मुद्दयावरुन मेश्राम कुटुंबीयांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. परिणामी परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह अजूनही शवागृहातच ठेवला गेला आहे. मेश्राम यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे . पुढे ते असेही म्हणतात जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कठोर भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूस काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे भासरे अनिल धानोरकरच जबाबदार आहे, असा थेट आरोप कुटुंबियानकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे आमच्या शेत जमिनीचा सातबारा आमच्या नावावर करावा, धानोरकर कुटुंबीयांकडून ताबा मिळवून द्यावा आणि पोलीस संरक्षण द्यावे, अशी देखील मागणी कुटुंबियांनी केली आहे.
हे देखील वाचा –
IRCTC Ticket Cancellation: रेल्वने केले नवीन बदल, ऐनवेळी ट्रेन तिकीट रद्द करता येणार?