Home / महाराष्ट्र / Chandrakant Khaire : धनुष्यबाण आम्हाला द्या!अन्यथा गोठवा! खैरेंचे मत

Chandrakant Khaire : धनुष्यबाण आम्हाला द्या!अन्यथा गोठवा! खैरेंचे मत

Chandrakant Khaire – धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)यांनाच द्यावे, अन्यथा ते गोठवून टाकावे....

By: Team Navakal
Chandrakant Khaire

Chandrakant Khaire – धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)यांनाच द्यावे, अन्यथा ते गोठवून टाकावे. कारण धनुष्यबाण (Arrow symbol) हा शिवसेनेच्या आत्म्याचा भाग आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे मूळ चिन्ह व वारसा आमचाच आहे, अशी भावूक प्रतिक्रिया उबाठाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. आज सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court)सुनावणीवर खैरे यांनी हे मत व्यक्त केले.

धनुष्यबाण आमच्यासाठी केवळ चिन्ह नाही, ती आमची श्रद्धा आहे. मातोश्रीवर (Matoshree)आजही त्या धनुष्यबाणाची पुजा केली जाते. त्यामुळे आम्हालाच ते चिन्ह मिळाले पाहिजे, अशी मागणीही खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यांचा जनमतावरील प्रभाव सांगताना ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत नेहमी मला मिळणाऱ्या मतांपैकी एक लाख मते ही केवळ धनुष्यबाण चिन्हामुळे त्यांना मिळाली. अनेक मतदारांना वाटले की त्यांनी मलाच मतदान केले. पण प्रत्यक्षात चिन्हामुळे ते गोंधळात पडले.

खैरे पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाने(Election Commission) आधी मशाल चिन्ह दिले. मग अचानक अशी मशाल अस्तित्वातच नाही, असे म्हणाले. यामुळे आमचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याचा मला मोठा फटका बसला.


हे देखील वाचा –

अजित पवारांनी साप पोसलेत ! मनोज जरांगेंची विखारी टीका

स्वसंरक्षणासाठीच अक्षय शिंदेचा एनकाऊंटर पोलिसांना न्यायिक समितीने क्लीन चीट दिली

Web Title:
संबंधित बातम्या