Fake Suicide Notes – मराठा (Maratha)समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC communities)देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे तर ओबीसीच्या आरक्षणाला (Reservation) धक्का लागू नये, असे म्हणत ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या या वादात काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले. लातूर जिल्ह्यात (Latur district)तिघांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणात आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या बनावट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
निलंगा (Nilanga) तालुक्यातील दादगी गावात १३ सप्टेंबरला शिवाजी मेळे (Shivaji Mele)यांचा विजेच्या करंट लागून मृत्यू झाला. त्यांच्या खिशात महादेव कोळी समाजाच्या (Mahadev Koli community) आरक्षणासाठी आत्महत्या केली अशी चिठ्ठी सापडली होती. चाकूर तालुक्यातील हनुमंतवाडी तांडा (Hanumantwadi Tanda) येथे १४ सप्टेंबरला अनिल बळीराम राठोड यांनी आत्महत्या केली. त्यांच्या खिशात बंजारा समाजासाठी आरक्षणासाठी आत्महत्या केली, अशी चिठ्ठी आढळली.
२६ ऑगस्टला अहमदपूर तालुक्यातील शिंदगी (Shindgi)येथील बळीराम श्रीपती मुळे (Baliram Shripati Mule)यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस तपासात या तिन्ही प्रकरणात नातेवाईकांनी चिठ्ठी नंतर ठेवली असल्याचे निष्पन्न झाले.या तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक आणि खोटी माहिती देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Amol Tambe)म्हणाले की, मृतदेहाजवळ मिळालेल्या चिठ्ठ्या हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवल्या होत्या. त्यासाठी संशयित आणि मयत यांच्या हस्ताक्षरांचे नमुने आम्ही दिले होते. तपासात संशयितांनी ती चिठ्ठी लिहिल्याचे स्पष्ट झाले. शिवाजी मेळे प्रकरणात निलंगा (Nilanga), अनिल राठोड प्रकरणात चाकूर (Chakur), तर बळीराम मुळे प्रकरणात अहमदपूर (Ahmadpur)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा –
अजित पवारांनी साप पोसलेत ! मनोज जरांगेंची विखारी टीका
स्वसंरक्षणासाठीच अक्षय शिंदेचा एनकाऊंटर पोलिसांना न्यायिक समितीने क्लीन चीट दिली