Home / महाराष्ट्र / Uddhav Thackeray Vs Eknath shinde: शिवसेना-धनुष्यबाणाची सुनावणी पुढे ढकली..धनुष्यबाण चिन्हाचा वाद कायम..

Uddhav Thackeray Vs Eknath shinde: शिवसेना-धनुष्यबाणाची सुनावणी पुढे ढकली..धनुष्यबाण चिन्हाचा वाद कायम..

Uddhav Thackeray Vs Eknath shinde: शिवसेना (Shivsena) हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याबाबत गेले दोन वर्ष संघर्ष सुरु आहे....

By: Team Navakal
Uddhav Thackeray Vs Eknath shinde

Uddhav Thackeray Vs Eknath shinde: शिवसेना (Shivsena) हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याबाबत गेले दोन वर्ष संघर्ष सुरु आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे. यावरच आज सुप्रीम कोर्टात जवळपास दोन महिन्यांनी पुन्हा सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी एक महिना लांबणीवर ढकलली. या प्रकरणाची अधिक माहिती ठाकरे गटाचे वकील अॅड. असिम सरोदे (Asim sarode) यांनी दिली.

या प्रकरणावर मागच्या 20 ऑगस्टला सुनावणी होणार होती. परंतु, या खंडपीठातील न्यायमूर्ती सूर्यकांता हे अन्य प्रकरणात घटनापीठात असल्याने पुढे शिवसेनेची सुनावणी लांबणीवर पडली होती. त्यानंतर आजच्या सुनावणीत कोर्टाकडून महत्त्वाचे निर्देश दिले जातील अशी शक्यता होती. मात्र, कोर्टाने हि सुनावणी पुढे ढकली. आता पुढील सुनावणीची तारीख १२ नोव्हेंबर हि जाहीर झाली आहे.

या सुनावणीत दोन्ही गटांनी युक्तिवादासाठी वेळ मागितला असून, आता या प्रकरणावर १२ नोव्हेंबरपासून सविस्तर युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे आपल्याला युक्तिवादासाठी फक्त 45 मिनिटे लागणार असल्याचे देखील सांगितले. तर, समोरील पक्षकारांच्या वकिलांनी आम्हाला युक्तिवादासाठी 3 दिवस लागणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आज न्यायालयाने तत्काळ सुनावणी दाखवण्याची तयारी दाखवली नाही. आज खंडपीठासमोर यापूर्वीच्या काही अर्धवट सुनावणी झालेली प्रकरणे होती. त्यामुळे त्यांनी त्या खटल्याला प्राधान्य दिले असावे असेही सरोदे यांनी सांगितले.

सरोदे यांनी सांगितले की, खंडपीठाने आता पुढील तारखेला सुनावणी घेण्याचे निश्चित केले असून १२ नोव्हेंबरपासून युक्तिवाद सुरू होणार आहे. पहिल्यांदा अॅड. कपिल सिब्बल हे आपल्या युक्तिवादाला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर विरोधी पक्षकाराकडून त्यांची बाजू देखील मांडली जाईल.



हे देखील वाचा –

Selling a minor girl अल्पवयीन मुलीची विक्री करून जबरदस्तीने लग्न..  नवऱ्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या