Cough Syrup: धोकादायक कोल्ड्रीफ कफ सिरप (Coldrif Cough Syrup) प्यायल्याने देशभरात 20 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना Pharmaceutical) उत्पादनांच्या तपासणीत कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
मृतांमध्ये एकट्या मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 4 बालकांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, चार वर्षांखालील मुलांना देऊ नयेत असे काही कोल्ड सिरप्स अजूनही बाजारात विकले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
मृत्यूचे कारण: 500 पट अधिक विषारी घटक
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे या बालकांचे मृत्यू झाले असून, यामागे कोल्ड्रीफ सिरपमध्ये ‘डायएथिलीन ग्लायकॉल’ या विषारी घटकाचे असलेले प्रमाण आहे. तपासणीत, या सिरपमध्ये DEG चे प्रमाण अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जवळजवळ 500 पट अधिक असल्याचे आढळले आहे.
तपासातून असे दिसून आले आहे की, उत्पादकांनी उत्पादन बॅच बाजारात सोडण्यापूर्वी त्यांची योग्य तपासणी केली नाही आणि काही सिरप्स निर्धारित सुरक्षितता मानकांचे पालन न करताच विकले गेले. DGHS ने सर्व औषध नियंत्रकांना उत्पादन सुविधांची तपासणी सुनिश्चित करण्याचे आणि ‘ड्रग्ज नियमांचे’ कठोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच, उत्पादकांनी कच्चा माल केवळ विश्वसनीय आणि मंजूर विक्रेत्यांकडूनच खरेदी करावा आणि विक्रेता पात्रता प्रणाली मजबूत करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कारवाई आणि राज्यांच्या उपाययोजना
या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, तमिळनाडूस्थितउत्पादकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी छिंदवाडा आणि जबलपूरच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरसह अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) उपसंचालकांना निलंबित केले असून, ड्रग्ज कंट्रोलरची बदली केली आहे.
याप्रकरणी छिंदवाडा येथील बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली असून, त्यांचे कुटुंब चालवत असलेले क्लिनिक सील करण्यात आले आहे. या मृत्यूंमुळे जनमानसात प्रचंड संताप असून, विरोधी पक्षांनी या प्रकरणाच्या न्यायिक चौकशीची ( मागणी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने कोल्ड्रीफ सिरप बॅच नं. SR-13 ची विक्री, वितरण आणि वापरावर बंदी घातली आहे. तसेच, राजस्थानमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू झाले असून, उत्तर प्रदेश ड्रग्ज विभागाने भेसळयुक्त कोल्ड्रीफ सिरपचा साठा जप्त केला आहे.
हे देखील वाचा – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली फ्लाईट कधी टेक ऑफ करणार? जाणून घ्या