Home / arthmitra / अब की बार $4,000 पार! सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ; जाणून घ्या विक्रमी किंमत वाढीमागची कारणे

अब की बार $4,000 पार! सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ; जाणून घ्या विक्रमी किंमत वाढीमागची कारणे

Gold Price Record: जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधण्यास सुरुवात केल्यामुळे सोन्याचे दर (Gold Price) गगनाला...

By: Team Navakal
Gold Price Record

Gold Price Record: जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधण्यास सुरुवात केल्यामुळे सोन्याचे दर (Gold Price) गगनाला भिडले आहेत. स्पॉट गोल्डचा (Spot Gold) दर प्रति औंस $4,036 पेक्षा जास्त झाला असून, सोन्याने एक नवा विक्रम (Record High) प्रस्थापित केला. भारतातही 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 20 हजारांच्या पुढे गेली आहे.

सोन्याच्या दरातील ही तेजी 1970 च्या दशकानंतरची सर्वात मोठी ठरली असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ जाहीर केल्यामुळे एप्रिलपासून दरात सुमारे एक तृतीयांशने वाढ झाली आहे.

सोन्याच्या वाढीची प्रमुख कारणे

सध्या सोन्याच्या दरात जी वाढ दिसत आहे, त्यामागे अनेक आर्थिक आणि भू-राजकीय घटक कारणीभूत आहेत.

यूएस सरकारचा शटडाऊन: अमेरिकेतील सरकारी शटडाऊन दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक डेटा जाहीर होण्यास विलंब होण्याची चिंता आहे. यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित आश्रयस्थानाकडे वळले आहेत.

व्याजदरात कपातीची अपेक्षा: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात करेल, अशी अपेक्षा बाजारात आहे. व्याजदर कमी झाल्यास बॉन्डसारख्या पारंपरिक गुंतवणुकीचा आकर्षकपणा कमी होतो आणि सोन्याचे आकर्षण वाढते.

मध्यवर्ती बँकांची खरेदी: 2022 पासून मध्यवर्ती बँकांनी दरवर्षी 1,000 टनांहून अधिक सोन्याची खरेदी केली आहे, जो एक महत्त्वाचा घटक आहे. चीन, भारत, पोलंड आणि तुर्की यांसारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवला आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत चीनच्या मध्यवर्ती बँकेने सलग 11 महिने सोन्याची खरेदी सुरू ठेवली आहे, ज्यामुळे त्यांचे एकूण सोन्याचे साठे सुमारे 2,303.5 टन झाले आहेत.

कमकुवत यूएस डॉलर: यूएस डॉलर कमकुवत होत असल्यामुळेही सोन्याला मजबुती मिळत आहे.

गुंतवणुकीतील धोके आणि तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेतील सरकारी शटडाऊन गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा लवकर संपला, तर सोन्याचे दर खाली येऊ शकतात. युनायटेड ओव्हरसीज बँकेच्या (UOB) तज्ज्ञांनुसार, सोन्याच्या किमतीत तेजी पुढील 12 ते 18 महिन्यांसाठी तेजीची शक्यता राहू शकते, परंतु किंमतीत घसरण होण्याचा धोकाही आहे.

व्याजदर वाढीचा धोका: जर महागाई अचानक वाढली आणि फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले, तर सोन्याचे मूल्य कमी होऊ शकते. 2022 मध्ये जेव्हा फेडने दर वाढवले होते, तेव्हा सोन्याचे मूल्य $2,000 वरून $1,600 प्रति औंसपर्यंत घसरले होते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इशारा: बँक ऑफ इंग्लंडने जागतिक बाजारात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान कंपन्यांच्या मूल्यांकनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या कंपन्यांचे मूल्य ‘फुगलेले’ दिसत असून, आर्थिक बाजारात तीव्र सुधारणा (Sharp Correction) होण्याचा धोका वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आता सोन्यात गुंतवणूक करावी का?

तज्ञांनी पोर्टफोलिओचा 15% भाग सोन्यामध्ये ठेवण्याची शिफारस केली आहे. सध्याची आर्थिक स्थिती 1970 च्या दशकासारखी आहे, जिथे महागाई आणि सरकारी कर्जाचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते. तज्ज्ञांच्या मते, सोन्यात 5 ते 15% पर्यंत गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) जसे की SPDR Gold Shares (GLD) किंवा iShares Gold Trust (IAU) च्या माध्यमातून प्रत्यक्ष सोने खरेदी न करता गुंतवणुकीचा लाभ घेता येतो.

हे देखील वाचा – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली फ्लाईट कधी टेक ऑफ करणार? जाणून घ्या

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या