Home / क्रीडा / Rinku Singh: क्रिकेटर रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धमकी! दाऊद टोळीने 5 कोटींची खंडणी मागितल्याचे उघड; दोन आरोपींना अटक

Rinku Singh: क्रिकेटर रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धमकी! दाऊद टोळीने 5 कोटींची खंडणी मागितल्याचे उघड; दोन आरोपींना अटक

Rinku Singh: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंगला (Rinku Singh) अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कुख्यात दाऊद...

By: Team Navakal
Rinku Singh

Rinku Singh: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंगला (Rinku Singh) अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कुख्यात दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनी टोळीने (Dawood Ibrahim D-Company) त्याच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे तपासात उघड झाले आहे.

मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला असता, फेब्रुवारी ते एप्रिल 2025 या कालावधीत रिंकू सिंगच्या प्रमोशन टीमला 3 वेळा खंडणीसाठी धमक्या आल्याचे समोर आले आहे.

आरोपींना वेस्ट इंडीजमधून अटक

या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवीद अशा दोन संशयितांना अटक केली आहे. हे दोघेही वेस्ट इंडीजमध्ये होते, जिथे त्यांना अटक करून 1 ऑगस्टला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

यापूर्वी याच आरोपींना दिवंगत आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. रिपोर्टनुसार, चौकशीदरम्यान यापैकी एका आरोपीने रिंकू सिंगला खंडणीसाठी कॉल केल्याची कबुली दिली आहे.

आरोपींनी रिंकू सिंगला फेब्रुवारी ते एप्रिल 2025 दरम्यान धमकीचे तीन मेसेज पाठवले. सुरुवातीला आरोपीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर दुसरा मेसेज करत 5 कोटी रुपये मागितले आणि तिसऱ्या मेसेजमध्ये इंग्रजीत ‘रिमांडर, डी कंपनी‘, असे लिहिलेले होते. आरोपींनी झिशान सिद्दिकीलाही धमकीचे मेल केले होते.

रिंकू सिंगची दमदार क्रिकेट कारकीर्द

रिंकू सिंग हा टीम इंडियासाठी एक उत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो. नुकतेच, रिंकूने आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला होता.

त्याने भारतासाठी आतापर्यंत एकूण 54 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, यामध्ये त्याने 161.77 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने 550 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 42.31 आहे.

आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून 58 सामने खेळले असून, त्यात 1,099 धावा जोडल्या आहेत. 2024 मध्ये कोलकाताला आयपीएल (IPL) जिंकवून देणाऱ्या संघात रिंकूचा महत्त्वाचा वाटा होता.

हे देखील वाचा – आता ब्रिटनमध्येही लागू होणार ‘आधार कार्ड’? UK च्या पंतप्रधानांनी भारत दौऱ्यावर घेतली ‘या’ खास व्यक्तीची भेट

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या