Youth commits suicide under police pressure – पोलिसांना शिवीगाळ करत समाजमाध्यमावर आव्हान देणाऱ्या युवकाने आत्महत्या केली. त्यानंतर संतप्त कुटुंबियांनी काल त्याचा मृतदेह चिमनगंज मंडी इथे भररस्त्यात ठेवत रास्तारोको केला.
चिमनगंज पोलीस ठाण्याच्या चार पोलिसांनी त्याचा छळ केल्यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
अभिषेक चौहान असे या १९ वर्षाच्या युवकाचे नाव असून त्याने व त्याचा मित्र विकी राठौड याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ करत पोलिसांना शिवीगाळ केली होती.
त्यानंतर त्याला अटक करण्यात आली व समज देऊन जामिनावर सोडण्यात आले. त्याने पोलिसांची माफी मागितल्याचा व्हिडीओही व्हायरल करण्यात आला. त्यानंतर चिमनगंज पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली.
चिमनगंज ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोळंकी यांनी त्याच्या कुटुंबियांकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या साऱ्याचा ताण असह्य होऊन त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या कुटुंबियांनी या पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस यात खरोखर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त नितीश भार्गव यांनी दिले आहे.
हे देखील वाचा –
सोहराबुद्दीन शेख चकमकीतील आरोपींची सुटका सीबीआयला मान्य
शिवसेना पक्ष व चिन्ह! पुन्हा तारीख!शिंदे गटाचा वेळकाढूपणा सुरूच
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन!आता वाढवण बंदराकडे पंतप्रधानांचे लक्ष