Home / देश-विदेश / UK MP Robert Jenrick : भारतीयांची वस्ती झोपडपट्टीसारखी ; ब्रिटीश खासदाराच्या विधानाने वाद

UK MP Robert Jenrick : भारतीयांची वस्ती झोपडपट्टीसारखी ; ब्रिटीश खासदाराच्या विधानाने वाद

UK MP Robert Jenrick – इंग्लडच्या बर्मिंगहॅममधील भारतीय (Indian) व दक्षिण आशियातील (South Asians)लोकांची वस्ती ही झोपडपट्टीप्रमाणे (slum-like)आहे, असे वादग्रस्त...

By: Team Navakal
UK MP Robert Jenrick

UK MP Robert Jenrick – इंग्लडच्या बर्मिंगहॅममधील भारतीय (Indian) व दक्षिण आशियातील (South Asians)लोकांची वस्ती ही झोपडपट्टीप्रमाणे (slum-like)आहे, असे वादग्रस्त विधान ब्रिटीश खासदार रॉबर्ट जनरिक यांनी केले आहे. त्यांच्या या विधावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

इंग्लंडच्या बर्मिंगहॅम (Birmingham)भागात अनेक भारतीय व अशियाई लोक राहतात. इंग्लंडमधील भारत अशी या भागाची ओळख आहे. अनेक भारतीय वस्तू मिळत असल्याने लंडनच्या इतर भागात राहणारे भारतीयही येथे खरेदीसाठी येत असतात. ब्रिटनच्या टोरी भागातील खासदार रॉबर्ट जेनरिक यांनी काही दिवसांपूर्वी बर्मिंगहॅमच्या हँडसवर्थ येथील सोहो मार्गावर चित्रीकरण केले होते. त्याचा संदर्भ देत त्यांनी एका संस्थेच्या मेजवानी दरम्यान हे विधान केले.

ते म्हणाले की, या भागात मला फारच अस्वच्छता दिसली व या ठिकाणी एकही ब्रिटीश नागरिक दिसला नाही. अशा प्रकारच्या देशाची मी कल्पना केली नव्हती. त्यांच्या या विधानाचा अनेकांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नागरिक, व्यवसायिक व राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. ते या विभागाची चुकीची प्रतिमा तयार करत असल्याचे म्हटले आहे. खासदार अयुब खान व महापौर रिचर्ड पारकर यांनीही त्यांचा या विधानाचा निषेध केला आहे. बर्मिंगहमचे बिशप यांनी हे विधान चुकीचे असल्याचे म्हटले असून गायक स्टेव्हन कपूर (singer Steven Kapoor)यांनी म्हटले की, हा भाग सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे.


हे देखील वाचा –

शिवसेना पक्ष व चिन्ह! पुन्हा तारीख!शिंदे गटाचा वेळकाढूपणा सुरूच

डोनाल्ड ट्रम्प यांना खरचं नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन!आता वाढवण बंदराकडे पंतप्रधानांचे लक्ष

Web Title:
संबंधित बातम्या