Home / महाराष्ट्र / Onkar elephant: ‘ओंकार’ हत्तीला आठ दिवसात पकडणार; वनविभागाचे आश्वासन!

Onkar elephant: ‘ओंकार’ हत्तीला आठ दिवसात पकडणार; वनविभागाचे आश्वासन!

Onkar elephant: महाराष्ट्र(Maharashtra) आणि गोवा(Goa) या दोन राज्यांच्या सीमा भागात हत्तीच्या (elephant) धुमाकूळाने शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. आक्रमक असलेला...

By: Team Navakal
Omkar elephant

Onkar elephant: महाराष्ट्र(Maharashtra) आणि गोवा(Goa) या दोन राज्यांच्या सीमा भागात हत्तीच्या (elephant) धुमाकूळाने शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. आक्रमक असलेला हा ‘ओंकार’ हत्ती सध्या मडुरा, सातोसे आणि कास परिसरात वावरताना दिसला आहे. या हत्तीला पकडण्यासाठी वन विभागाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. यासाठी वनविभागाने विशेष ‘वॉर रूम’ तयार केला आहे. तसेच पुढील आठ दिवसांत हत्तीला जेरबंद केले जाईल, असे ठोस आश्वासन देखील जिल्हा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी ग्रामस्थांना दिले आहे.

सध्या मडुरा, सातोसे आणि कास या गावांमध्ये रात्रीच्या वेळी ‘ओंकार’ हत्तीचा वावर प्रचंड वाढलेला आहे. अवकाळी पाऊस आणि त्यात भर म्हणून हा ओंकार हत्ती या हत्तीने शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ग्रामस्थांनी या बाबत तक्रार देखील नोंदवली . ग्रामस्थांच्या या गंभीर तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई व्हावी, यासाठी शिवसेना जिल्हाप्रमूख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक शर्मा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी संजू परब आणि ग्रामस्थांना सांगितले की, ‘ओंकार’ हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम एका ‘वॉर रूम’ प्लॅननुसार युद्धपातळीवर सुरू असून पुढील आठ दिवसांत हत्तीला पकडण्यात निश्चितपणे यश येईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले आहे.


हे देखील वाचा –

Curry Leaves for Hair: कढीपत्यामुळे केसांची वाढ? ३० दिवसातच वाढतील केस!

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या