Dhanteras Gold 2025: सण म्हटलं कि अगदी सगळ्यांनमध्येच उत्साहच वातावरण असत. आणि दिवाळीत(Diwali) तर हा आनंद द्विगुणित होतो. तस बघायला गेल तर दिवाळी (Diwali)५ दिवसांचीच असते. त्यात या पाचही दिवसांचं स्वतःच वेगळं अस महत्व आणि पावित्र्य असत. या सणाची सुरवात धनतेरसपासून होते. या दिवशी वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला.
पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार मनला जातो. पुराणात असेही म्हटले जाते कि समुद्रमंथनाच्या वेळी तो अमृताचा घागर घेऊन समुद्रात बाहेर पडला होता. धन्वंतरी ही देवता म्हणूनच पूजली जाते. यामुळे आरोग्य, आणि दीर्घायुष्य देखील ती प्रदान करते. या दिवशी सोन घेणयावर अनेकांचा भर असतो. या वर्षी धनत्रयोदशी(Dhanteras) हि १८ ऑक्टोबरला आली असून या दिवशी पूजा आणि खरेदीसाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत
कोणत्या शुभ मुहूर्तावर करायची सोने खरेदी:
धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यासाठीचा पहिला मुहूर्त १२: १८ वाजता सुरु होत असून, दुसऱ्या दिवशी १९ ऑक्टोबरला दुपारी १:५१ ला संपणार आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्यासाठीचा अमृत काळ सकाळी ८:५० ते सकाळी १०:३३ पर्यंत असेल. धनतेरसला सोने आणि चांदी खरेदीसाठी प्रदोष काळ संध्याकाळी ५:४८ ते रात्री ०८:२० पर्यंत असेल. वृषभकाळ संध्याकाळी ७:१६ ते रात्री ९:११ पर्यंतचा असेल. धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी चौघड्याचा शुभ मुहूर्त: शुभ – सर्वोत्तम: सकाळी 7:49 ते सकाळी 09:15धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त ०७:१६ ते ०८:२० पर्यंतचा असेल.
हे देखील वाचा –
Pune ATS News : पुण्यात ATS कडून छापेमारी.. पुण्यात दहशवादी नेटवर्क? २५ ठिकाणी ATS कडून छापेमारी