Cough Syrup Death : सध्या देशात कफ सिरपमुळे (Cough Syrup) लहान मुलांच्या झालेल्या मृत्यूच प्रकरण जोरदार गाजत आहे. हा विषारी कफ सिरप (Cough Syrup) ‘कोल्ड्रिफ’ बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन (Ranganathan-govindan)यांना एमपीसीट यांनी (MP SIT)अटक केली आहे. रात्री उशिरा या नराधमाला अटक करण्यात आली. पोलिसांनी रंगनाथन गोविंदन यांना पकडण्यासाठी २० हजार रुपयांच इनाम जाहीर केले होत. रंगनाथन गोविंदन हे काही दिवसांपासून फरार होते. त्यांचं घर चेन्नई येथे आहे. याच बरोबर कांचीपुरम तमिळनाडू येथील फॅक्टरीला त्यांनी टाळं लावलं होत.
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, विषारी कफ सिरप कोल्ड्रिफ पिऊन २० निष्पाप बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर छिन्दवाडाच्या परासिया पोलीस ठाण्यात ५ ऑक्टोंबरला औषध निर्माता कंपनी श्रीसन फार्माच संचालक मंडळ, बालरोजतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण सोनी आणि अन्य जबाबदार व्यक्तींविरोधात कलम १०५,२७५ तसेच ड्रग्स आणि कॉस्मेटिक एक्ट १९४०च्या कलम २७अ अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे.
बालरोजतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण सोनी या आरोपीला पोलिसांनी आधीच अटक केली होती. पण बाकी गुन्हेगारांना अटका झाल्या नव्हत्या. औषध निर्माता कंपनीच्या मालकाच्या अटकेसाठी छिन्दवाड़ा एसपी अजय पांडे यांनी १२ सदस्यीय एसआयटीची (SIT) स्थापना केली होती. पोलीस सूत्रांनुसार, एसआयटी (SIT) टीम रंगनाथन यांना चेन्नईवरुन भोपाळला घेऊन जात आहे. तिथे कफ सिरप निर्माण, कच्चा मालाचा पुरवठा, वितरण नेटवर्क आणि लायसन्सशी संबंधित घोळ याची सखोल चौकशी केली जाईल. सिरपमध्ये घातक केमिकलचा समावेश का करण्यात आला? कंपनीच्या क्वालिटी तपास प्रक्रियेत इतकी गंभीर चूक कशी काय झाली? याचा शोध पोलीस घेत आहेत.
कोल्ड्रिफ नावाच्या या कफ सिरपच्या सेवनाने मध्य प्रदेशात २० बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. संपूर्ण राज्यात या घटनेने खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाने तात्काळ विक्रीवर बंदी देखील घातली. संबंधित कंपनी विरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे. या घटनेने औषधांच्या सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.
कंपनी मालकाला चेन्नईच्या अपार्टमेंटमधून ताब्यात घेतल
अटकेपासून वाचण्यासाठी रंगनाथन मागच्या अनेक दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांच्यावर इनाम जाहीर करुन तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अनेक आठवड्यांपासून शोधमोहिम सुरु ठेवली होती. याच प्रकरणात स्थापन झालेल्या एसआयटीने (SIT) इलेक्ट्रॉनिक सर्विलांस आणि स्थानिक सुत्रांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. आणि शेवटी आरोपी गजाआड झाला. त्याला चेन्नई येथील अपार्टमेंटमधून ताब्यात घघेण्यात आलं
हे देखील वाचा –
Dhanteras Gold 2025: धनतेरसला सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या!