Home / देश-विदेश / Israel VS Gaza : इस्त्रायल-हमास युद्धच पुढे काय? गाझामध्ये शांतता परतणार? डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा!

Israel VS Gaza : इस्त्रायल-हमास युद्धच पुढे काय? गाझामध्ये शांतता परतणार? डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा!

Israel VS Gaza : इस्रायल आणि हमास (Israel VS Gaza) यांच्या युद्धाच्या चर्चा जगभरात सुरु आहेत. अशातच यांनी अमेरिकेच्या (America)हस्तक्षेपानंतर...

By: Team Navakal
Israel VS Gaza

Israel VS Gaza : इस्रायल आणि हमास (Israel VS Gaza) यांच्या युद्धाच्या चर्चा जगभरात सुरु आहेत. अशातच यांनी अमेरिकेच्या (America)हस्तक्षेपानंतर तयार केलेल्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती दर्शविली आहे. याची प्राथमिक माहिती डोनाल्ड ट्रम्प(Donald-Trump) यांनी दिली आहे. या करारामुळे गाझामध्ये सुरू असलेल युद्ध देखील थांबेल. एवढंच नाही तर कैद्यांची सुटका देखील होईल. इजिप्तमध्ये आज झालेल्या या करारावर हमासने देखील सहमती दर्शविल्याची माहिती आहे.

    इस्रायल आणि हमास दोघांचीही शांतता प्रस्तावावर सहमती:

    ट्रम्प यांनी ट्रुथआउट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ते म्हणाले, “मला हे जाहीर करताना खूप अभिमान वाटतो आहे कि इस्रायल आणि हमास दोघांनीही आमच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती दर्शविली. याचा अर्थ असा की सगळ्या ओलिसांना लवकरच सोडले जाईल आणि इस्रायच सैन्य एका निश्चित सीमेवर माघार घेईल. हे शांततेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.”

    इतकंच नाही तर, “सर्व पक्षांना चांगली वागणूक दिली जाईल. ही ऐतिहासिक कामगिरी शक्य करण्यात मदत करणाऱ्या कतार, इजिप्त आणि तुर्कीमधील मध्यस्थांचे देखील आम्ही आभार मानतो”, असही ट्रम्प म्हणाले.

    सर्व बंधक आता घरी परततील – बेंजामिन नेतान्याहू

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले की, “शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाल्यानंतर, सर्व बंधक घरी परततील. हा एक राजनैतिक यश आणि इस्रायलसाठी नैतिक विजयाचा दिन आहे. आमच्या सर्व बंधकांना परत आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही ते म्हणाले.”

    दीर्घकाळ सुरु असणाऱ्या युद्धावर आता, ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच हे युद्ध संपण्यात यश येईल. या शांतता करारात अमेरिकेसोबतच इजिप्त आणि कतारनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


    हे देखील वाचा –

    Bhide Bridge Pune :भिडे पूल वाहतुकीसाठी खुला.. प्रशासनानाकडून मोठी घोषणा..

    Web Title:
    For more updates: , , stay tuned with Navakal
    संबंधित बातम्या