Kartik Month Rules: प्रत्येक महिन्याचे स्वतंत्र असे महत्व असते. तसेच कार्तिक महिन्याला हिंदू धर्मात विशेष (Kartik Month) महत्त्व आहे. अस म्हटलं जात या महिन्यात भगवान विष्णू दीर्घकाळाच्या निद्रेनंतर जागे होतात. कार्तिक महिन्यात (Kartik Month) भगवान विष्णू (Lord Vishnu)आणि माता लक्ष्मीची (Lord Lakshmi)पूजा केल्याने जीवनामध्ये सुख-समाधान येते. घरातलं वातावरण प्रसन्न राहत. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने दीपावली पाडवा, भाऊबीज तुळशीचं लग्न, दीपोत्सव, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाते. कार्तिक स्नानाचेही सखोल महत्त्व आहे. ८ नोव्हेंबर पासून कार्तिक मास सुरु झाला आहे. या महिन्यात केलेले कोणतेही साधेसे व्रतही दुर्लभ फळ देऊन जाते. साधक आणि उपासकारांसाठी तर हा महिना विशेष उपासनेचा आहे.
पुराणात म्हटले आहे की भगवान नारायणाने ब्रह्माला, ब्रह्माने नारदाला आणि नारदाने महाराज पृथूला कार्तिक महिन्यातील महत्त्व सांगितलेले होते. कार्तिक महिन्यात काही पदार्थ खाणे आणि काही गोष्टी वर्ज्य देखील करायच्या असतात.कार्तिक महिन्यातील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे दीपदान.
दीप दान का करावे?
कार्तिक महिन्यात दीप लावणे म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा, आणि नाकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय मानला जातो.संध्याकाळी स्नान केल्यावर जवळच्या तळ्यात दीपदान केल्यावर आयुष्यातील दोष दूर होतात, असे पुराण सांगते. रोज संध्याकाळी तुळशीसमोर दीप प्रज्यवलीत केल्याने घरत लक्ष्मी येते आणि दारिद्रय दूर होत. तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने पितृ दोष नाहीसा होतो असे शाश्त्र सांगते. याच बरोबर तांदूळ देखील दान करावेत, यामुळे चंद्रदोष दूर होवून चंद्राचे शुभ फळ मिळते. नदी, तलाव, तळात इत्यादीमध्ये दीपदान केल्याने पुण्य मिळते. कार्तिक महिन्यात तुळशीचे पूजन महत्त्वाचे. शास्त्रानुसार, या महिन्यात रोज सकाळ-संध्याकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा देखील लावावा. तुळसीचे पूजन आणि तुळशी पत्र सेवन करणे विशेष उत्तम मानले जाते. कार्तिक महिन्यात तेल लावणे देखील निषिद्ध मानले जाते. या महिन्यात सहसा तेल लावू नये. या महिन्यात इंद्रियांवर संयम मिळवणे गरजेचे आहे. कारण सात्विक जीवन केवळ शरीरातूनच नाही तर मनापासून देखील स्वीकारले पाहिजे. अशा स्थितीत व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालनसुद्धा करायला हवे. इतरांची निंदा करणे,याचसोबत टीका करणे, वाद घालणे, जास्त झोप घेणे यांसारख्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
जमिनीवर झोपणे देखील कार्तिक महिन्यात महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय जमिनीवर झोपल्याने मनात सात्त्विकतेची भावना निर्माण होते.आणि इतर आजार नाहीसे होतात.डाळी देखील या महिन्यात वर्ज कराव्यात. यात प्रामूख्याने; उडीद, मूग, मसूर, हरभरा तसेच मटार, मोहरी इत्यादी गोष्टी खाऊ नयेत. लसूण, कांदा, मांसाहार आणि मद्य याचे देखील सेवन करू नये. या महिन्यात पूर्णपणे सात्विक जीवन जगणे अपेक्षित आहे. कार्तिक महिन्याच गुळाचे दान तसेच गुळाचे सेवन शुभ मानले जाते. तसेच वांगी, कारले यांसारख्या भाज्या खावू नयेत. कार्तिक महिन्यात गंगेत स्नान करण्याला देखील तितकेच पवित्र मानले जाते.
या महिन्यात भगवान विष्णूची आराधणा करतात. भगवान विष्णूचा मंत्र जप, विष्णू सहस्त्रनाम, गीता इत्यादींचे पठण करतात. कार्तिक महिना हा भक्तीचा आणि सात्विक विचार आणि आहाराचा तसेच परमेश्वरापर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचा महिना मानला जातो.
हे देखील वाचा –