Diwali Chakli: दिवाळी (Diwali) म्हटल कि दिवे, घराला उजळून टाकनारी लायटिंग आणि मुख्य म्हणजे फराळ आणि त्यातही प्रामुख्याने चकली(Chakli) हि सगळ्यांचीच आवडीची असते. पण बरेचजण हि चकली (Chakli) करायचा कंटाळा करतात , कारण; चकली बनवायची पद्धत देखील तितकीच अवघड असते. यात काहींची चकली फसतेसुद्धा, काहींची चकली कुरकुरीत बनत नाही अश्या तक्रारी आपण सतत दिवाळीत ऐकत असतो. पण काही सोप्या ट्रिक्स (Tricks) याला अपवाद आहेत. या ट्रिक्स वापरून तुम्ही देखील या दिवाळीत तुमच्या प्रियजनांना अश्या खुशखुशीत चकल्या खाऊ घालू शकता.
चकलीसाठी लागणारी सामग्री:
तांदूळ : २ ½ कप / ५०० ग्रॅम
हरभऱ्याची डाळ : १ कप / २०० ग्रॅम
मूग डाळ : ½ कप / १०० ग्रॅम
उडीद डाळ : ½ कप / १०० ग्रॅम
या सर्व डाळीचं पीठ- डाळी या स्वच्छ धुवण त्या नीट कोरड्या करून घ्याव्यात. मध्यम आचेवर कढई तापवा आणि त्यात तांदूळ छान परतून घ्या. रंग बदलू देऊ नका. तांदूळ परतून झाले की ते वेगळे काढून ठेवा. त्याच कढईत हरभऱ्याची डाळ लालसर होईपर्यंत परता आणि ती सुद्धा वेगळी काढा. त्यानंतर मूग डाळ थोडीशी लालसर होईपर्यंत परता आणि बाजूला ठेवा. उडीद डाळ सोनेरी रंगाची होईपर्यंत परता आणि ताटात काढा. हे सर्व साहित्य थंड करून मगच दळायला दयाव.
धणे : २० ग्रॅम
जिरे : २० ग्रॅम
पाणी : ३ कप (गरम उकळत)
तेल – ¼ कप
तिखट – १ टीस्पून
मीठ – चवीनुसार
धणेपूड – १ टेबलस्पून
ओवा – १ टीस्पून
एका परातीत चकलीचा पीठ घ्या त्यात गरम पाणी आणि हलकं गरम तेल टाका, यामुळे पीठ मऊ बनते. त्यानंतर त्यात लाल तिखट, मीठ आणि धणेपूड घाला. याचबरोबर ओवा आणि तीळ घालून पलित्याच्या साहाय्याने सगळं एकजीव करून घ्या. (पिठाचंप्रमाण जास्त असल्यास पिठाचा भाग आर्धा अर्धा करून मळा.) पीठ मळून झाल्यावर चकलीच्या भांड्याच्या साहाय्याने तिला आकार द्या. त्यानंतर एका कढईमध्ये गरजेनुसार तेल घाला तेल तापल्यावर त्यात चकली हलक्या हाताने तेलात सोडा. चकली दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तळून झालेल्या चकल्या बाहेर काढून जास्त तेल निथळून द्या. आणि एका ताटात ह्या चकल्या काढून घ्या. तर; अश्या पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी खुसखुशीत अशी चकली बनवू शकता.
हे देखील वाचा –
डोनाल्ड ट्रम्प यांना खरचं नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का? जाणून घ्या नामांकन प्रक्रियेबद्दल