Nobel Prize Literature: जगातील सर्वोच्च साहित्य पुरस्कारांपैकी एक नोबेल साहित्य पुरस्कार २०२५ चा विजेता कोण असेल याबद्दलची उसुक्ता सगळ्यांमध्येच होती. आज या पुरस्काराच्या मानकऱ्याच नाव अखेर जाहीर झालं आहे. यंदा नोबेल पुरस्काराच्या शर्यतीमध्ये अनेक लेखक होते परंतु; हंगेरीचे लेखक लास्झ्लो क्रास्झ्नाहोर्काई यांच्या उत्कृष्ट्र साहित्याने नोबेल त्यांनी त्यांच्या नावावर केला आहे. क्रास्झ्नाहोर्काई यांचे लेखन सर्वनाशाच्या दहशतीच्या काळात, कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करते, अशा शब्दांमध्ये स्टॉकहोम येथील स्वीडिश अकॅडमीच्या नोबेल समितीने त्यांचा साहित्याचा गाैरव केला आहे. उद्ध्वस्त ग्रामीण जीवनाचे वास्तवावादी दर्शन घडविणारा लेखक.
१९८५ मध्ये लिहिलेल्या त्यांच्या सगळ्यात पहिल्या कादंबरी सातांतांगोमध्ये त्यांनी सामूहिक शेतावरील (collective farm) अत्यंत रसातळाला गेलेल्या आणि उद्ध्वस्त ग्रामीण समुदायाचे वास्तववादी चित्रण केले होते. या कादंबरीला साधारणतः तीन दशकांनंतर २०१३ या सालात इंग्रजीमध्ये सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार मिळाला होत.सातांतांगो या कांदबरीवर तब्बल सात तासांचा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. त्याच बरोबर त्यांची कारकीर्द भाषेइतकीच प्रवासानेही घडवली आहे.
त्यांनी सुरुवातीच्या काळात १९८७ मध्ये कम्युनिस्ट हंगेरी सोडले. फेलोशिपसाठी जर्मनीतील पश्चिम बर्लिनमध्ये ते एक वर्ष राहिले. यानंतर पूर्व आशिया विशेषतः मंगोलिया आणि चीनमध्येही ते वास्तव्यास होते. विनाशकारी कथाकथनाच्या पलीकडे जात क्रास्झ्नाहोर्काई यांनी पूर्व आशियातील प्रवासातून प्रेरित होऊन आपल्या साहित्यिक दृष्टिकोनाचासुद्धा विस्तार केला. बुकरच्या परीक्षकांनी त्यांच्या ‘विलक्षण लांबीच्या आणि अविश्वसनीय सीमांपर्यंत पोहोचणाऱ्या अद्भुत अश्या वाक्यांचे’ कौतुक केले होते. ‘हे वाक्ये कधी गंभीर, कधी अगदी वेड्यासारखे, कधी उपहासात्मक तर कधी निराशाजनक असा सूर घेत आपली विक्षिप्तपणे वाटचाल करत होते. असे मत देखील परीक्षकांनी मांडले होते.
BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2025
The 2025 #NobelPrize in Literature is awarded to the Hungarian author László Krasznahorkai “for his compelling and visionary oeuvre that, in the midst of apocalyptic terror, reaffirms the power of art.” pic.twitter.com/vVaW1zkWPS
एक संमोहक लेखक’ क्रास्झ्नाहोर्काई यांचे इंग्रजी भाषांतरकार, कवी जॉर्ज सिरटेस (George Szirtes) यांनी ‘एएफपी’ (AFP) वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांना ‘एक संमोहक लेखक’ असे संबोधले आहे. ‘त्यांचे लेखन तुम्हाला त्यांच्या जगात घेवून जाते त्यांच्या लेखणीत एक वेळीच जादू आहे. असेही त्यांनी नमूद केले आहे.
या वेळी अनेक साहित्यक या स्पर्धेत उतरले होते. भारतातील अमिताभ घोष यांचेही नाव चर्चेत होते. यावर्षीही मुराकामी तसेच ऑस्ट्रेलियन लेखक जेराल्ड मुर्नन, मेक्सिकन लेखिका क्रिस्टिना रिवेरा गार्झा रोमानियाचे मिर्सिया कार्तारेस्कु , अमेरिकेचे थॉमस पिंचॉन, चीनच्या कॅन झुए यांची देखील नावे चर्चेत होती.
याआधी कोणाकोणाला साहित्यात नोबेल पुरस्कार मिळाला आहे..
फ्रेंच कवी सुली प्रुधोम यांना १९०१ मध्ये पहिले नोबेल यांना साहित्य पारितोषिक मिळाले होते.
स्वीडनच्या सेल्मा लागेरलॉफ (Selma Lagerlöf) ह्या १९०९ मध्ये हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
फ्रान्सने देखील साहित्यातील सर्वाधिक (१६) नोबेल विजेते लेखक दिले आहेत.
१२४ वर्षांच्या इतिहासात केवळ अठरा महिलांनाच हा सन्मान मिळाला आहे.
हे देखील वाचा–
डोनाल्ड ट्रम्प यांना खरचं नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का? जाणून घ्या नामांकन प्रक्रियेबद्दल