Home / News / Rakesh Kishore : राकेश किशोरचे सभा सदत्व रद्द ; बार असोसिएशनची कारवाई

Rakesh Kishore : राकेश किशोरचे सभा सदत्व रद्द ; बार असोसिएशनची कारवाई

Rakesh Kishore : सरन्यायाधीश बी. आर. गवई (Chief Justice B. R. Gavai)यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी जोडा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या अ‍ॅड....

By: Team Navakal
Rakesh Kishore

Rakesh Kishore : सरन्यायाधीश बी. आर. गवई (Chief Justice B. R. Gavai)यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी जोडा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या अ‍ॅड. राकेश किशोरचे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे तात्पुरते सभासदत्व रद्द करण्याची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे त्याला दिलेले ओळखपत्रही रद्द झाले. यापुढे त्याला ओळखपत्राचा वापर करण्यास मनाई आहे.

बार असोसिएशनने (Bar Association)नमूद केले की, अ‍ॅड. राकेश किशोरचे कृत्य अत्यंत गंभीर आहे. त्याने असोसिएशनच्या नोंदणीकृत वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. अशा प्रकारचे निषेधार्ह, असभ्य आणि असंयमी वर्तन हे न्यायालयातील अधिकाऱ्यास शोभणारे नाही. हे वर्तन व्यावसायिक नैतिकतेचा, न्यायालयीन शिष्टाचाराचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Cour) प्रतिष्ठेचा अपमान आहे.

दरम्यान, किशोर याच्याविरोधात बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरन्यायाधीशांनी किशोरविरोधात कोणतीही तक्रार दिली नव्हती.


हे देखील वाचा –

भारतीयांची वस्ती झोपडपट्टीसारखी ; ब्रिटीश खासदाराच्या विधानाने वाद

डोनाल्ड ट्रम्प यांना खरचं नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन!आता वाढवण बंदराकडे पंतप्रधानांचे लक्ष

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या