BJP Vs NCP : कोथरुड गोळीबार प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या घायवळ गँगप्रकरणाने राजकीय रंग घेतला आहे. या गँगचा प्रमुख निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ (Sachin Ghaywal)यांच्याभोवती वादाची साखळी तयार झाली आहे. सचिन घायवळला राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार शस्त्र परवाना मिळाला हे उघड झाले.
त्यामुळे विरोधकांनी मंत्री योगेश कदम (Minister Yogesh Kadam.)यांच्या राजीनाम्याची मागणी केली.तर रोहित पवार (MLA Rohit Pawar)यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानपरिषद सभापती राम शिंदे (Ram Shinde) आणि हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar)यांचा घायवळला पाठिंबा असल्याचा आरोप केला. त्यावर भाजपाने रोहित पवार यांना प्रत्युत्तर देताना यह रिश्ता क्या कहलाता है? म्हणत सचिन घायवळ आणि रोहित पवार यांचेच फोटो पोस्ट केले.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की,निलेश घायवळ हा विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा जवळचा आहे.त्याचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी राम शिंदे यांनी सांगितले असावे अशी चर्चा आहे.अन्यथा त्यांनी मंत्री कदम यांना थेट फोन केला असावा किंवा गृहमंत्रालयातून त्यांच्यावर दबाव आला असावा. एका गुंडाच्या भावाला सहज परवाना मिळाला म्हणजे यामध्ये अनेक वरिष्ठ सहभागी असू शकतात. त्यामध्ये त्यांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि धाराशिवचे तानाजी सावंत हे थेट नाही .परंतु त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा पाठिंबा असल्याचे सांगितले. निलेश घायवळला खोट्या नावावर पासपोर्ट मिळाला आणि तो अहमदाबाद विमानतळावरून लंडनला पळून गेला. तेथे धाराशिवच्या काही नेत्यांनी त्याला मदत केल्याची चर्चा आहे.हे सामन्यांचे नाही तर गुंड आणि कंत्राटदरांचे सरकार असल्याचे सिद्ध होते. गृहमंत्र्यांनी याची चौकशी करावी.
भाजपाचे नवनाथ बन (Media Head Navnath Ban)यांनी एक्स वर रोहित पवार व सचिन घायवळ यांचे फोटो पोस्ट करून लिहिले की,आमदार रोहित पवार यांचे सचिन घायवळ यांच्यासोबतचे काही फोटो! परवान्यासाठी अर्ज कसा करायचा यांचे मार्गदर्शन रोहित पवार करत होते का? यह रिश्ता क्या कहलाता है?
आमदार रोहितजी पवार यांचे सचिन घायवळ यांच्यासोबतचे काही फोटो!
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 9, 2025
परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहितजी करत होते का?
यह रिश्ता क्या कहलाता है? https://t.co/tU5gNs6BM4 pic.twitter.com/y2Wew18Bn6
तर शस्त्रपरवाना प्रकरणी उबाठाचे अनिल परब (Anil Parab)यांनी मंत्री कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले योगेश कदम यांचे अनेक कारनामे मी पुराव्यांसह यापूर्वी विधिमंडळात मांडले आहेत. मात्र मुख्यमंत्री प्रत्येक वेळी त्यांची पाठराखण करतात. पुणे जिल्ह्यात ७० गँग सक्रिय असून खंडणी, खून, दरोड्यांचे प्रकार वाढले आहे.सचिनवर खून व खंडणीसारखे गुन्हे असून, पोलिसांनी याआधी परवाना नाकारला होता. मात्र, अपील आल्यानंतर योगेश कदम यांनीच त्याला सज्जन ठरवत परवाना मंजूर केला. यावर प्रत्युत्तर देत शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले की योगेश कदम गेली 3-4 वर्षे टार्गेटवर असून, वारंवार बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तरीही ते निवडून येतात आणि खात्यांची जबाबदारीही मिळते, हेच विरोधकांचे दुखणे आहे.
पत्रकार परिषद – ०९ ऑक्टोंबर २०२५#ShivsenaUBT #पत्रकारपरिषद #PressConference #AnilParab pic.twitter.com/AFWvACe934
— Anil Parab (@advanilparab) October 9, 2025
गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की,मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसल्यापासून गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला परवाना देण्याची शिफारस केलेली नाही.या भूमिकेवर मी ठाम आहे. परवाना जेव्हा दिला जातो तेव्हा तो संबधित पोलीस आयुक्तांच्या सहीने दिला जातो.मी याबाबत सर्व सविस्तर माहिती आवश्यक असल्यास पत्रकार परिषद घेऊन देईन.गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचे काम आजपर्यंत आमच्याकडून झालेले नाही.
हे देखील वाचा –
ब्रिटनची नऊ नामवंत विद्यापीठे भारतात शाखा सुरू करणार
डोनाल्ड ट्रम्प यांना खरचं नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का?
हिजाबवरून दीपिकाला केलं ट्रॉल; हिजाब परिधानकरून दीपिकाच जाहिरात शूट