Mahim Sea Food: मुंबईतील पहिले सी फूड प्लाझा (Mahim Sea Food Plaza) माहीम कोळीवाड्यातील समुद्र किनार्यावर आहे. पावसाळा आणि मासेमारी बंदीमुळे हे सी फूड प्लाझा पालिकेच्या नियमानुसार बंद ठेवण्यात आले आहे. आता पाऊस परतीच्या वाटेवर असल्याने पालिकेने येत्या १५ ऑक्टोबरपासून ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.
नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर माहीम सी फूड प्लाझा सुरू करण्यात आले. स्थानिक महिलांना रोजगार मिळावा आणि या परिसरात पर्यटन वाढीला चालना मिळावी याच उद्देशाने कोळी महिला बचत गटांच्या माध्यमातून हे सी फूड प्लाझा चालवले जाते. खवय्यांसाठी माहीम चौपाटीवर सुरू केलेल्या या सी फूड प्लाझाला मुंबईकरांची चांगली पसंती मिळत आहे. समुद्राच्या सान्निध्यात अस्सल कोळी पद्धतीचे जेवण, कोळी संस्कृतीचा आस्वाद घेता येईल, अशा या सी फूड प्लाझाला पर्यटकांचीही पसंती मिळत आहे.
दरम्यान, स्टॉलवरून कोळी महिला आणि बचत गटांमध्ये वादाचा प्रकार समोर आला आहे. यावर महापालिकेने कोळी समाजासोबत बैठक घेऊन कोळीवाड्याच्या आत राहणाऱ्या महिलांच्या स्वयं-साहाय्य गटांना काही स्टॉल दिले आहेत. पण काही स्वयं-साहाय्य गटांनी फक्त माहीम बीचलगत राहणाऱ्या महिलांनाच व्यवसायाची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.
हे देखील वाचा –
घायवळ प्रकरणी रोहित पवारांचे आरोप ! भाजपाकडून त्यांचेच फोटो व्हायरल
महाराष्ट्रातील न्यायालयांचा कारभारावर सुप्रीम कोर्ट चिंतेत; आरोपपत्रानंतरही दोष निश्चित नाहीत