Home / महाराष्ट्र / लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana September Installment: महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजनेच्या...

By: Team Navakal
Ladki Bahin Yojana September Installment

Ladki Bahin Yojana September Installment: महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजनेच्या लाभार्थींसाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी ही दिवाळीपूर्वीची ‘गुड न्यूज’ आहे.

सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून (10 ऑक्टोबर) वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी E-KYC (ई-केवायसी) प्रक्रिया करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana: E-KYC न केल्यास हप्ता थांबणार

या योजनेतील 1,500 रुपयांचा सन्मान निधी यापुढेही अखंडपणे मिळत राहावा यासाठी सर्व पात्र महिलांनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. जर दिलेल्या मुदतीत E-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर पुढील हप्ते मिळण्यात अडचणी येतील किंवा तो थांबवला जाईल.

Ladki Bahin Yojana: E-KYC करण्याची सोपी प्रक्रिया

लाभार्थी महिलांना E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील सोप्या टप्प्यांचा वापर करता येईल:

  • वेब पोर्टलवर जा: लाभार्थी महिलांनी ladakibahin.maharashtra.gov.in या योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलवर भेट द्यावी.
  • आधार क्रमांक नोंदवा: पोर्टलवर ‘लाभार्थी आधार क्रमांक’ नोंदवावा.
  • कॅप्चा आणि संमती: यानंतर कॅप्चा कोड अचूकपणे नोंदवा आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती (Consent) द्या.
  • ओटीपी (OTP) प्रविष्ट करा: संमती दिल्यानंतर, तुमच्या आधार-संलग्नित मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी (One Time Password) येईल, तो प्रविष्ट करून E-KYC प्रक्रिया पूर्ण करा.
  • या प्रक्रियेत तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक आणि उत्पन्नाची माहिती यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.

सप्टेंबरच्या निधीला मंजुरी

दरम्यान, सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे. या हप्त्यासाठी वित्त विभागाने ₹410.30 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

हे देखील वाचा कोण आहे शैरी सिंग? पहिल्यांदाच भारतीय सौंदर्यवतीने पटकावला Mrs Universe 2025 किताब

Web Title:
संबंधित बातम्या