PMC Junior Engineer Vacancy: पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या 169 स्थायी (Permanent) पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये अस्थिरता असताना अनेक तरुण अभियंत्यांसाठी ही सरकारी सेवेतील सुवर्णसंधी ठरणार आहे.
जागा वाढल्या, पण प्रक्रिया रखडली
मार्च 2024 मध्ये ही भरती 113 पदांसाठी सुरू झाली होती, जी आता वाढवून 169 करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोंबरपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे.
यापूर्वी महापालिकेने 2022-23 मध्ये 748 आणि मार्च 2024 मध्ये 113 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. या भरतीला मोठा प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे यंदाही मोठ्या संख्येने अर्ज येतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
भरती रखडण्याची प्रमुख कारणे
या भरती प्रक्रियेसाठी सुमारे 28,700 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र, प्रशासनाच्या संथ कारभाराचा फटका त्यांना बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर ही भरती रखडली होती.
राज्य सरकारने मराठा समाजासाठी 10% आरक्षण (SEBC) लागू केल्याने, या आरक्षणाचा समावेश करण्यासाठी प्रक्रिया थांबली. यासाठी मागास वर्ग विभागाने सहा महिने काम केले. आरक्षणाच्या प्रक्रियेत वेळ गेल्यामुळे महापालिकेचा परीक्षा घेणाऱ्या आयबीपीएस (IBPS) संस्थेसोबतचा करार संपुष्टात आला.
करार पुन्हा झाल्यानंतर 4,493 उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून SEBC मध्ये अर्ज बदलण्याची संधी देण्यात आली.
प्रशासनाचे आव्हान
महापालिकेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी ही भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनाने पुढील दोन महिन्यांच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून यशस्वी उमेदवारांना फेब्रुवारी मध्ये नियुक्ती मिळू शकेल. मात्र, महापालिका निवडणुकीच्या गडबडीमुळे ही भरती प्रक्रिया तिसऱ्यांदा आचारसंहितेत अडकण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अखेरच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज करणे गरजेचे आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होईल.
उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यासह शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावी लागतील.
हे देखील वाचा – कोण आहे शैरी सिंग? पहिल्यांदाच भारतीय सौंदर्यवतीने पटकावला Mrs Universe 2025 किताब