Home / लेख / Apple MacBook Air M4 ला खूपच कमी किंमतीत खरेदीची संधी; हजारो रुपयांची होईल बचत; पाहा डिटेल्स

Apple MacBook Air M4 ला खूपच कमी किंमतीत खरेदीची संधी; हजारो रुपयांची होईल बचत; पाहा डिटेल्स

Apple MacBook Air M4 Discount Offer: जर तुम्ही ॲपल मॅकबुक (Apple MacBook) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी...

By: Team Navakal
Apple MacBook Air M4 Discount Offer

Apple MacBook Air M4 Discount Offer: जर तुम्ही ॲपल मॅकबुक (Apple MacBook) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. Apple MacBook Air M4 या दमदार लॅपटॉपवर सध्या 18,000 रुपयांपर्यंतचा मोठा डिस्काउंट मिळत आहे.

विशेष म्हणजे ही जबरदस्त डील फ्लिपकार्ट (Flipkart) किंवा ॲमेझॉनवर (Amazon) नसून, इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर विजय सेल्स (Vijay Sales) कडून दिली जात आहे.

कितीमध्ये खरेदी करता येईल?

Apple MacBook Air M4 चे 16GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट बाजारात 99,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले होते. विजय सेल्सवर (Vijay Sales) हा लॅपटॉप सध्या 8,000 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह लिस्ट आहे.

  • बँक ऑफर: आयसीआयसीआय (ICICI) बँक आणि एसबीआय (SBI) कार्डवर अतिरिक्त 10,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
  • एकूण बचत: दोन्ही ऑफर्सचा फायदा घेतल्यास ग्राहकांना एकूण 18,000 रुपयांची मोठी बचत करता येईल.
  • अंतिम किंमत: सर्व डिस्काउंटनंतर हा लॅपटॉप तुम्ही फक्त 81,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Apple MacBook Air M4 मध्ये काय आहे खास?

एम4 प्रोसेसर (M4 Processor) मुळे हा लॅपटॉप पूर्वीच्या व्हर्जनपेक्षा उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो. तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर हा एक चांगला पर्याय आहे.

  • डिस्प्ले: यात 13.6-inch चा लिक्विड रेटिना डिस्प्ले मिळतो.
  • प्रोसेसर आणि कोर: यात 10-Core CPU आहे, ज्यामुळे कामाची गती वाढते.
  • बॅटरी: कंपनीच्या दाव्यानुसार, हा लॅपटॉप 18 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ देतो.
  • इतर फीचर्स: यात 12MP चा फ्रंट कॅमेरा असून, सेंटर स्टेज आणि डेस्क व्ह्यूज यांसारखे फीचर्स व्हिडिओ कॉलिंग आणि कंटेंट क्रिएशनसाठी उपयुक्त ठरतात. तसेच, दोन एक्सटर्नल डिस्प्लेला सपोर्ट करण्याची क्षमता यात आहे.

हे देखील वाचा कोण आहे शैरी सिंग? पहिल्यांदाच भारतीय सौंदर्यवतीने पटकावला Mrs Universe 2025 किताब

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या