Deepika Padukone on 8 Hour Shift Row: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने चित्रपटसृष्टीत ‘8 तासांच्या शिफ्ट’ची (8-Hour Shift) मागणी केल्याने निर्माण झालेल्या वादावर अखेर मौन सोडले आहे. याच कारणामुळे तिने संदीप रेड्डी वंगा यांचा ‘स्पिरिट’ (Spirit) आणि नाग अश्विन यांच्या ‘कल्की 2898 एडी 2’ (Kalki 2898 AD Sequel) मधून एक्झिट घेतल्याचे बोलले जात आहे.
दीपिकाच्या 8 तासांच्या शिफ्टची सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चा रंगली होती. अनेकांनी तिचे याबाबत समर्थन केले, तर काहींनी तिच्यावर टीका केली होती. आता यावर दीपिकाने पहिल्यांदाच भाष्य केले.
पुरुष अभिनेत्यांना नाही, मग मलाच विरोध का?
एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या या निर्णयाला होत असलेल्या विरोधावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “एक महिला असल्यामुळे जर माझी ही मागणी दबावासारखी वाटत असेल, तर तसंच समजा. पण हे काही गुपित नाही की, भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक पुरुष सुपरस्टार्स अनेक वर्षांपासून 8 तास काम करत आहेत आणि ही गोष्ट कधीही बातमी बनली नाही.”
दीपिकाने पुढे स्पष्ट केले की, अनेक मोठे पुरुष अभिनेते वर्षांपासून दिवसातून फक्त 8 तास काम करतात आणि त्यापैकी काही जण तर सोमवार ते शुक्रवार इतकेच काम करतात, ते वीकेंडला काम करत नाहीत.
चित्रपटसृष्टीला ‘सिस्टम’ची गरज
दीपिकाच्या मते, भारतीय चित्रपटसृष्टीला ‘उद्योग’ म्हटले जाते, पण आम्ही कधीही खऱ्या अर्थाने उद्योगाप्रमाणे काम केले नाही. “ही एक अत्यंत अव्यवस्थित इंडस्ट्री आहे आणि आता या कामाच्या संस्कृतीत काहीतरी व्यवस्था आणण्याची वेळ आली आहे,” असे मत तिने व्यक्त केले.
यामुळे सोडले दोन चित्रपट
रिपोर्टनुसार, ‘स्पिरिट’ चित्रपटातून बाहेर पडण्याचे कारण कथितरित्या ‘8 तासांची शिफ्ट’ ही मागणी होती, जेणेकरून तिला आपली मुलगी दुआ (Dua) सोबत वेळ घालवता येईल. मात्र, तिची मागणी पूर्ण न झाल्याने तिने चित्रपट सोडला.
अलीकडेच, ‘कल्की 2898 एडी’ च्या निर्मात्यांनीही दीपिका आता सिक्वेलचा भाग नसल्याचे जाहीर केले.
दीपिकाचे आगामी चित्रपट
‘कल्की 2898 एडी 2’ मधून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी दीपिकाने सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ (King) चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात ती शाहरुख खान (Shah Rukh Khan), सुहाना खान आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. याव्यतिरिक्त, ती ॲटली यांच्या आगामी AA22xA6 या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे.
हे देखील वाचा – कोण आहे शैरी सिंग? पहिल्यांदाच भारतीय सौंदर्यवतीने पटकावला Mrs Universe 2025 किताब