Period Leave: मुख्यमंत्री (CM) सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने नोकरदार महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिलांना मासिक पाळी दरम्यान भरपगारी रजा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे रोजगार मंत्री संतोष लाड यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडला.
मंत्री लाड यांनी सांगितले की, २०२४ मध्ये वर्षातून सहा रजा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे आता आम्ही दरमहा एक दिवस म्हणजेच वर्षाला १२ दिवस रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे कर्नाटक हे देशात सर्व क्षेत्रांमध्ये मासिक पाळी रजा लागू करणारे पहिले राज्य ठरणार आहे.
महिलांना घरकामांव्यतिरिक्त मुलांची काळजी देखील घ्यावी लागते. मासिक पाळीमुळे त्यांना मानसिक ताण देखील येतो. म्हणून, मासिक पाळीच्या रजेच्या तरतुदीचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने शिफारस दे खीलकेली की सहा दिवसीय रजा देण्यात यावी. तथापि, सरकारने दरवर्षी १२ दिवसांची रजा देण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्तप केला आहे.
देशात पहिल्यांदा १९९२ मध्ये बिहारमध्ये मासिक पाळीची रजा लागू झाली. बिहार हे मासिक पाळीची रजा सुरू करणारे पहिले राज्य आहे. ते दर महिन्याला दोन दिवसांची मासिक पाळीची रजा देत आहेत. मात्र या दोन्ही राज्यातील निर्णय सर्व क्षेत्रासाठी लागू नाही.
हे देखील वाचा –
Saif Ali Khan: सैफला होतोय पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन पश्चाताप? तिने मला खूप साथ दिली