Special-Buses:दिवाळीनिमित्त(Diwali) स दि. १५ ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत या जादा बस (BUS)सोडण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांची गावी जाण्याची सोया होणार आहे. नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर पुण्यात राहणाऱ्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
दिवाळीत हे नागरिक गावी जातात. सध्या रेल्वेचे बुकिंग देखील फुल्ल झाले आहे. त्यामुळे नागरिकांना एसटीसोडून दुसरा पर्याय नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात एसटीला कायम गर्दीच असते. यासाठी एसटीकडून या जादा बसची सोय करण्यात आली आहे. यंदा दिवाळीच्या कालावधीत नियमित बस व्यतिरिक्त जादा बस सोडण्यात येणार आहेत. जादा बसचे ऑनलाइन बुकिंग देखील सुरू झाले आहे. आता नागरिक एसटी महामंडळाच्या संकेतस्थळ अथवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुकिंग करू शकतात. तसेच, एसटीच्या अधिकृत तिकीट बुकिंग केंद्रावर देखील तिकीट आरक्षण सुरू झाले आहे.
मागील काही वर्षे दिवाळीच्या काळात खडकी कँन्टोमेंट या ठिकाणहून मराठवाडा, विदर्भासाठी जादा बस सोडण्यात येत होत्या. पण, या वेळी खडकीची जागा योग्य नसल्यामुळे एसटी महामंडळाकडून नवीन जागेचा शोध घेतला जात होता. वाकडेवाडी बसस्थानकासमोर आरेची जागा देण्याची मागणी देखील एसटीकडून करण्यात येत होती. पण, ही जागा मात्र पीएमआरडीएच्या ताब्यात असल्याने त्यांनी ही जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे शेवटी एसटी महामंडळाने पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी स्वारगेट एसटी बसस्थानक येथून जादा बस सोडणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात जाणाऱ्या गाड्या स्वारगेट येथून सुटणार आहेत शिवाय या बसची संख्या ११३ इतकी असणार आहे. तर, शिवाजीनगर येथून देखील ८० जादा बस सोडण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा –
Period Leave: कर्नाटकात नोकरदार महिलांसाठी मोठी घोषणा; कर्नाटकात मासिक पाळीच्या रजेला अखेर मान्यता