Ajit Pawar: पुण्यातील वाढता दहशवाद हा पुण्याच्या शांततेला लागलेला मोठा काळ डाग आहे. सध्या पुणे गाजत आहे ते निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) या प्रकरणामुळे. या प्रकरणाबाबतचे अनेक खुलासे आरोप समोर आले आहेत. यावरून महायुतीत एकमेकांवरील आरोपांची मालिका सुद्धा आपण पहिली. या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांचा सुद्धा हात असल्याचा देखील दावा होत आहे. यांनी निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळसाठी आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर केला असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सप्ष्टपणे भाष्यता केली आहे. या संदर्भात आज अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी घायवळ प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी स्वतः सीपींना सांगितले आहे, कोण कुठल्या गटाचा, ताटाचा, पक्षाचा, कुणाचा जवळचा कार्यकर्ता, लांबचा कार्यकर्ता, कोणाबरोबर फोटो आहेत, नाहीत, ह्या गोष्टींना महत्व देऊ नका. सगळ्यांसाठी कायदा हा सामान आहे. जर तिथे चूक असेल जर कोणी नियमांची पायमल्ली करत असेल, तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई करा,अशी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी दिली.
पुढे ते असेही म्हणतात,शिफारस केलेली असली तरी शस्त्र परवाना दिलेला नाही,असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितल होत. त्यावर मी आयुक्तांना सांगितल आहे, पुण्याचा असुदे किंवा पुण्या बाहेरचा, कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवणं हे आपल्या सर्वांचे काम आहे,
पोलिसांसाठी देखील हि महत्त्वाची जबाबदारी आहे, मी त्यामध्ये कोणत्याही राजकारण्यांचा राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही, आम्ही तिथे दोन दिवस एकत्र होतो. मी स्वतः आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सगळे काही काळ एकत्र होतो. मुख्यमंत्र्यांनी देखील हीच भूमिका घेतली आहे, अजिबात कोणाची फिकीर करायची नाही, ज्यांनी चुका केलेल्या असतील त्यांच्यावर कारवाई हि झालीच पाहिजे. एकंदरीत या सगळ्याची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई हि होईलच. असं आश्वासन अजित पवारांनी दिल आहे.
या संदर्भातील आरोपांवर देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे. “कोण काय म्हणत, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संविधानाने प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे, मी राज्याच्या प्रमुखांशी या बाबत बोललो आहे, दोषींवर योग्य ती कारवाई होईल. पालकमंत्री म्हणून तुम्ही या आधी मला अनेक वर्ष पाहिलं आहेत. अनेकजण तुमच्यासोबत फोटो काढतात, आपल्याला महिती देखील नसतं कोण काय असतं, फोटो असन म्हणजे त्या व्यक्तीशी आपले खाजगी संभंध आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. चौकशी करताना फोन, संभाषण पुरावे मिळाले तर कारवाई हि केली जाईल. मी जे आहे ते जाहीरपणे बोलतो, अन्याय झाला तर मी तुमच्याकरता सर्वस्व देखील पणाला लावेन, पण तुमचे हात बरबटले असले तर आम्ही तुम्हाला पाठीशी घालणार नाही. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
हे देखील वाचा –