Home / आरोग्य / Cough Syrup: तुम्हीसुद्धा सर्दी-खोकल्यावर कफ सिरप घेता का? त्यापेक्षा करा हे घरघुती उपाय

Cough Syrup: तुम्हीसुद्धा सर्दी-खोकल्यावर कफ सिरप घेता का? त्यापेक्षा करा हे घरघुती उपाय

Cough Syrup: मेडिकल गोष्टी असुदे किंवा औषध काही गोष्टींवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. काही औषध केमिकल युक्त नसतात पण...

By: Team Navakal
Cough Syrup

Cough Syrup: मेडिकल गोष्टी असुदे किंवा औषध काही गोष्टींवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. काही औषध केमिकल युक्त नसतात पण प्रत्येक औषध केमिकल युक्त आहे कि नाही ते कस समजणार, अशी भावना जवळजवळ सगळ्यांच्याच मनात असते. त्यात नुकत्याच झालेल्या  कफ सिरप प्रकरणामुळे बरेच जण सर्दी-खोकल्यावरच औषधे घेण्यास कचरत आहेत. सर्दी खोकला अगदी कोणत्याही प्रहरी होऊ शकतो यात काही शंका नाही. अश्या परिस्थिती जर नैसार्गिक मार्गानी या सर्दी खोकल्यावर इलाज केला तर.. आयुर्वेदामधील काही सोपे आणि प्रभावी उपाय निश्चितच उपयुक्त ठरतील. आयुर्वेद हे पूर्वापार चालत आलं आहे त्यातील काही महत्वाचे उपाय करून बघा खोकल्यापासून तर आराम भेटेलंच शिवाय तुमची रोगप्रतिकारक (Immune system) शक्ती वाढेल.

त्यातील पहिला आणि मुख्य उपाय म्हणजे आल आणि मध यांचे मिश्रण (Ginger and Honey) आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरीचे गुणधर्म आहेत; मध घशाला आराम देतो. 1 चमचा आल्याचा रस आणि त्यात 1 चमचा मध मिसळून हे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळेला घ्यावे. यामुळे घसादुखी आणि खोकला लवकर कमी व्हायला मदत होते.

दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे तुळस आणि काळी मिरीचा चहा (Tulsi and Black Pepper Tea) तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. काळी मिरी कफ बाहेर काढण्यास मदत करते. ५ ते ६ तुळशीची पाने, २ ते ३ काळी मिरी बारीक करून १ वाटी पाण्यात उकळवा. आणि गाळून गरम प्या.

तिसरा उपाय म्हणजे लसूण(Garlic). लसूण अगदी सहज कोणत्याही घरी मिळू शकते. लसणात अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल असे गुणधर्म आहेत. जे संसर्गाशी लढत असतात. १ लसणाची पाकळी कच्ची चावा याशिवाय तुम्ही ती तुपात भाजूनही खाऊ शकता.

चौथ्या उपायात तुम्ही मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. (Salt Water Gargle) घसादुखी आणि सूज कमी करण्यासाठी हा जुन्या कळसापासून चालत आलेला हा प्रभावी उपाय आहे. १ ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून दिवसातून २ ते ३ वेळाला  गुळण्या करा.

पाचव्या उपायात महत्वाचं आहे ते हळद घातलेलं दूध (Turmeric Milk) हळदीमध्ये अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात आणि दूध शरीराला उष्ण ठेवते . 1 ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे खोकला शमतो आणि निद्रेत बाधा येत नाही.


हे देखील वाचा –

Ajit Pawar: निलेश घायवळच्या राजकीय कनेक्शनवर अजित पवार स्पष्टच बोलले

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या