OBC Morcha: महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून अनेक संघर्ष सुरु आहेत. मराठा मोर्चा तसेच ओबीसी मोर्चाचा आपला -आपला स्वतः चा असा वेगळा संघर्ष आहे. अशातच मराठा आरक्षण संदर्भातील २ सप्टेंबरचा शासन आदेश रद्द करा. अन्यथा मुंबईसह पुणे, ठाणे जाम करण्याचा इशारा आज ओबीसी नेते आणि काँग्रेस आमदार विजय वड्डेटीवार यांनी सरकारला दिला आहे. विदर्भातील ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वात आज ओबीसी संघटनांनी महामोर्चा आयोजित केला होता.

यशवंत चौक ते संविधान चौकापर्यंत रॅली देखील काढली होती. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख, माजी आमदार महादेव जानकर यांच्यासह इतर बडे ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान विजय वड्डेटीवारानी सरकारला इशारा देखील दिला आहे. २ सप्टेंबरचा जीआर फसवणूक आहे. हा जीआर म्हणजे ओबीसीमध्ये घुसखोरी करून त्यांच्या मानेवर अघोरी वार करण्याचं काम सरकार करत आहे.
सगळा मराठा समाज ओबीसीत आला
विदर्भात होणाऱ्या पदभरतीमध्ये ओबीसींच्या सर्व जागा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील जागा ओबीसी प्रमाणपत्राच्या आधारे भरल्या जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. जरांगे उपोषणाला बसले तेव्हा मराठवाड्यात ८ हजार ३०० मराठ्यांच्या कुणबी नोंदी होत्या. त्यांना प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नव्हता . परंतु शिंदे समिती शिफारशीनंतर मराठवड्यात मागील २ वर्षात २ लाख ४१ हजार प्रमाणपत्र वाटली. आता रोज हजार प्रमाणपत्र दिली जातात. पूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर इंजिनीअरींग, मेडिकल तुमचा नंबर लागणार नाही.सरकार उपवर्गीकरणाचे काम करत आहे. त्या सर्वेक्षणात कुणबी समाजाला मराठा समाजाबरोबर टाकले तर विदर्भातील ओबीसी उद्धवस्त होईल. जरांगे आमच्या मूळावर उठला आहे. फडणवीस सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचे काम करण्यासाठी जरांगेच्या समोर झुकले. तेलंगणामध्ये ओबीसींना ४२ टक्के आरक्षण दिले. महायुतीच्या फडणवीस, शिंदे पवार सरकारने एवढे आरक्षण देण्याची धमक दाखवावी. ओबीसी समाज तुमच्या पाठीशी उभा राहील . परंतु आम्हाला फसवत असाल तर आम्ही शांत बसणार नाही. त्यांनी (मराठा समाजाने)मुंबई जाम केली होती.हा काळा जीआर रद्द केला नाही तर आम्ही मुंबईसह पुणे ठाणे जाम केल्याशिवाय राहणार नाही.

ओबीसी मोर्चातील घोषणेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की,विजय वड्डेटीवार यांचे भाजपा प्रवेशापुरते काम झाले आहे.तो ओबीसीचा मोर्चा नव्हता काँग्रेसचा मोर्चा होता. गोरगरीब ओबीसींचे मत आहे की मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर प्रमाणपत्र दिले पाहिजे. आता सर्व छगन भुजबळ यांच्या आहारी गेले आहेत.मराठ्यांचा यांना द्वेष आहे.मराठ्यांनी लढवून मिळवले तरी यांना ते खपत नाही. मराठ्यांच्या १५० वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. नेते असून तुम्हाला कळत नाही.एका वर्षात ओबीसीमध्ये १०० जाती घातल्या.त्यांना फक्त मोर्चाला गर्दी पाहिजे असते.२ सप्टेंबरचा जीआर रद्द करा !अन्यथा
मुंबईसह पुणे, ठाणे जाम करणार
नागपूरमधून ओबीसी नेत्यांचा इशारा
मराठा आरक्षण संदर्भातील २ सप्टेंबरचा शासन आदेश रद्द करा. अन्यथा मुंबईसह पुणे, ठाणे जाम करण्याचा इशारा आज ओबीसी नेते व काँग्रेस आमदार विजय वड्डेटीवार यांनी उपराजधानी नागपूरमधील मोर्चात दिला. विदर्भातील ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वात आज ओबीसी संघटनांनी महामोर्चा आयोजित केला होता. यशवंत चौक ते संविधान चौकापर्यंत रॅली काढली होती. त्यानंतर नेत्यांनी सभेला संबोधित केले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख, माजी आमदार महादेव जानकर यांच्यासह इतर ओबीसी नेते उपस्थित होते. आमदार विजय वड्डेटीवार यावर अधिक बोलताना म्हणाले, २ सप्टेंबरचा जीआर फसवणूक आहे. हा जीआर म्हणजे ओबीसीमध्ये घुसखोरी करून त्यांच्या मानेवर सुरी चालवण्याचे काम सरकार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदारांची काळजी घेतली. परंतु जरांगे आमच्या मूळावर उठला आहे. फडणवीस सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचे काम करण्यासाठी जरांगेच्या समोर झुकले. तेलंगणामध्ये ओबीसींना ४२ टक्के आरक्षण दिले. महायुतीच्या फडणवीस, शिंदे पवार सरकारने एवढे आरक्षण देण्याची धमक दाखवावी. ओबीसी समाज तुमच्या पाठीशी उभा राहील . परंतु आम्हाला फसवत असाल तर आम्ही शांत बसणार नाही. त्यांनी (मराठा समाजाने)मुंबई जाम केली होती.हा काळा जीआर रद्द केला नाही तर आम्ही मुंबईसह पुणे ठाणे जाम केल्याशिवाय राहणार नाही.
मागील २ वर्षात २ लाख ४१ हजार प्रमाणपत्र वाटली. आता रोज हजार प्रमाणपत्र दिली जातात. पूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर इंजिनीअरींग, मेडिकल तुमचा नंबर लागणार नाही. सरकार उपवर्गीकरणाचे काम करत आहे. त्या सर्वेक्षणात कुणबी समाजाला मराठा समाजाबरोबर टाकले तर विदर्भातील ओबीसी उद्धवस्त होईल.
हे देखील वाचा –
Honey Trap: महायुतीच्या आमदाराकडे केली खंडणीची मागणी; अश्लील फोटो आणि बरच काही..