Chhath Puja – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एकेकाळी समुद्रकिनारी छठ पूजेच्या आयोजनास विरोध दर्शवला होता. त्यानंतर परप्रांतीय विरोधी आंदोलनांनी रंग घेतला होता. मात्र आता परिस्थिती अशी आहे की, छठ पूजेतील भाविकांची संख्या वाढल्याने मुंबई महानगरपालिकेला (Brihanmumbai Municipal Corporation) मेट्रो आणि बेस्ट बस (BEST Bus) सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छठ पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत पूजेच्या काळात नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी मेट्रो आणि बेस्ट बस सेवा उशिरापर्यंत चालू ठेवण्याचे ठरले.
पालिकेचे उपायुक्त प्रशांत सकपाळे (Deputy Commissioner Prashant Sakpale)यांनी सांगितले की, शहरातील छठ पूजास्थळे निश्चित करण्यात आली असून तेथे पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, पूजेसाठी टेबल, वाहतूक नियंत्रण, शौचालये तसेच महिला भाविकांसाठी कपडे बदलण्याच्या स्वतंत्र खोल्या उभारण्यात येणार आहेत.सध्या मुंबई व उपनगरात एकूण ४० पूजास्थळे निश्चित करण्यात आली असून हा आकडा ६० स्थळांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –
जरांगेंमध्ये सुसंस्कृतपणा नाही; मंत्री छगन भुजबळांची टीका
फडणवीस आणि राज उद्या एकाच मंचावर; ट्रेलर लॉंचिंगला एकत्र हजेरी..