Yogesh Kadam News: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ( Nilesh Gaiwal) याच प्रकरण जोरदार गाजताना दिसत आहे. त्याचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना मिळाल्याने नवीन चर्चाना चांगलंच उधान आला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला (Sachin Ghaywal)शस्त्र परवाना दिला अशी खळबळजन माहिती समोर आली होती. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच सत्र सुरु झाल. यामध्ये योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात होती. या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याबद्दल एक सुनावणी गृह राज्यमंत्र्यांनी याआधी घेतली होती. परंतु पोलीस आयुक्तांनी वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे परवाना दिला गेलाच नाही. जर; परवाना दिला असता तर अशाप्रकारचा आरोप योग्य असता. परंतु; परवाना दिलाच नाही. या सगळ्यानंतर योगेश कदमांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न:
२०१९ पासूनच माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा डाव अनेकजण आखात आहे. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलोच. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून दिवसागणिक वाढल्या, परंतु तेव्हासुद्धा ज्या विरोधक उमेद्वाराला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम देखील काहीजणांनी केलं. स्वतःच्याच पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते. छोटी मोठी वादळे उठली म्हणून पर्वत हलतो असे नाही. अशी पोस्ट त्यांनी केली.
२०१९ पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी…
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) October 10, 2025
गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना आजवर माझ्यावर कोणीही अश्या गलीच्छ प्रवृत्तीचे आरोप कोणीही करू शकलं नाही. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज खराब करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या गलीच्छ राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत त्याची राजकारणाची पातळी ढासळत गेली. अश्या प्रकारची पोस्ट शेअर करत त्यांनी विरोधकांवर सडकून टिका केली आहे.
हे देखील वाचा –
सरकारी नोकरीची संधी; इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत बंपर भरती, 30,000 रुपये पगार